नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्ही जर का कुठे फिरायला जाण्याचं प्लॅनिंग करत असाल आणि फ्लाइट तिकीट बुक करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. Go Air तुमच्यासाठी एक चांगली ऑफर आणली असून ते तुम्हाला अनेक मार्गांवर तिकीट उपलब्ध करून देत आहेत. Go Air कंपनी Go Fly सेलअंतर्गत २६ फेब्रुवारीपर्यंत अनके मार्गांवर कमी दरात फ्लाइट तिकीट देत असून हा सेल तीन दिवस म्हणजे २६ फेब्रुवारीपर्यंतच असणार आहे. या ऑफरमध्ये तुम्हाला आकर्षक दरात इंटरनॅशनल फ्लाइट तिकीट बुक करता येऊ शकते. या सेलअंतर्गत तुम्हाला घरगुती मार्गावर विमानाचे तिकिट 957 रुपयांवर मिळू शकते. इंटरनॅशनल फ्लाइटस्वाथी सुरुवातीचे दर ५,२९५ रुपये ठेवले असून या सेलअंतर्गत तुमची यात्रा ११ मार्च ते १५ एप्रिल २०२० पर्यंत करता येऊ शकते.
या मार्गाचे तिकीट आहे सर्वात स्वस्त
GoAir Go Fly सेलअंतर्गत कंपनी अहमदाबादपासून इंदोरपर्यंत सर्वात स्वस्त म्हणजे ९५७ रुपयात तिकीट दिले जात आहे. तसेच बेंगुळुरुपासून कोलंबोचे तिकीट केवळ ५,२९५ रुपयात बुक करू शकता.
याप्रकारे कंपनी कोचीपासून बंगुळुरूपर्यंत १,०५९ रुपये, कोलकातापासून भुवनेश्वरपर्यंत १,५२९ रुपये, इंदोरपासून नवी दिल्लीपर्यंत १,५४३ रुपये, पुण्यापासून बंगुळुरूपर्यंत १,५९० रुपये, मुंबईपासून बंगुळुरुपर्यंत १,६५४ रुपये आणि हैद्राबादपासून गोव्यापर्यंत १,६५९ रुपये तिकीट असे दर आहेत.
इंटरनॅशनल तिकीट आहे स्वस्त
आंतरराष्ट्रीय मार्गांवर गो एअर अबू धाबी ते कन्नूर ६,२६२ रुपये, दिल्ली ते बँकॉक ६२३२ रुपये, मुंबई ते बँकॉक ६,२५8 रुपये, अबू धाबी ते मुंबई ६,२८6 रुपये यासह अनेक मार्गांवरील तिकिटे स्वस्त दरात देत आहे.