पणजी : वृत्तसंस्था – गोव्यात समुद्र किनार्यावर (Goa beach) दोन अल्पवयीन मुलींवर (minor girls) सामूहिक बलात्काराची (gang raped) घटना घडली आहे. या प्रकरणावर विधानसभेत भाजपाचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (BJP Chief Minister Pramod Sawant) यांच्या वक्तव्या (statement) ने गोंधळ उडाला आहे. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत म्हटले होते की, आई-वडीलांना आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे की त्यांची मुले संपूर्ण रात्रभर बीचवर (Goa beach) काय करत होती. या वक्तव्यावरून विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे आणि हे वक्तव्य लाजीरवाणे असल्याचे म्हटले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विधानसभेत लक्षवेधी नोटीसवर चर्चा करताना बुधवारी म्हटले, जेव्हा 14 वर्षाची मुले संपूर्ण रात्रभर समुद्रकिनार्यावर राहातात, तेव्हा आई-वडीलांना आत्ममंथन करण्याची आवश्यकता आहे. मुले ऐकत नाहीत, केवळ यासाठी सरकार आणि पोलीसांवर जबाबदारी टाकू शकत नाही.
Nawab Malik | रश्मी शुक्ला यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्याकडून फोन टॅपिंगची परवानगी घेतली होती का?
आई-वडीलांची सुद्धा जबाबदारी
गृह विभागाची सुद्धा सांभाळत असलेल्या सावंत यांनी म्हटले की, आपल्या मुलांची सुरक्षा ठरवणे आई-वडिलांची जबाबदारी आहे. त्यांनी आपली मुले विशेषता अल्पवयीन मुलांना रात्र-रात्रभर बाहेर राहू देऊ नये.
विरोधक झाले आक्रमक
काँग्रेसच्या गोवा युनिटचे प्रवक्ते अल्टोन डी कोस्टा यांनी गुरुवारी म्हटले की गोव्यात कायदा आणि व्यवस्था बिघडली आहे. रात्री बाहेर फिरताना आम्ही का घाबरायचे? गुन्हेगारांनी जेलमध्ये असायला हवे आणि कायद्याचे पालन करणार्या नागरिकांनी बाहेर फिरायला हवे.
Web Title :- goa beach on beach whole night row over goa chief minister s remark in rape case
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Union Home Ministry | केंद्राच्या राज्यांना महत्वाच्या सूचना; 31 ऑगस्टपर्यंत निर्बंध कडक ठेवा
Shilpa Shetty | शिल्पा शेट्टीच्या आईची फसवणूक, जुहू पोलीस ठाण्यात FIR दाखल, जाणून घ्या प्रकरण