नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय मुलींना आपलं हृदय देणाऱ्यांच्या यादीत आता ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक ऑलराऊंडर ग्लेन मॅक्सवेलचं नावंही समाविष्ट झालं आहे. ग्लेन मॅक्सवेल गेल्या दोन वर्षांपासून भारतीय वंशाच्या मुलीला डेट करत आहे.
ग्लेन मॅक्सवेल आणि भारतीय वंशाची विनी रमन गेल्या 2 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. अशी माहिती समोर आली आहे की, ग्लेनला विनी रमनसोबत लग्न करायचं आहे. परंतु त्यांच्या लग्नाच्या तारखेबद्दल मात्र कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
जर ग्लेन मॅक्सवेलने विनीसोबत लग्न केलं तर शॉन टॅट नंतर असं करणारा तो दुसरा खेळाडू असेल ज्याने भारतीय वधूशी लग्न केलं आहे. 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज शॉन टॅट यानेदेखील भारतीय वंशाच्या मासूम सिंघा सोबत लग्न केलं होतं. दोघंही आयपीएल पार्टीदरम्यान भेटले होते. नंतर ते रिलेशनशिपमध्ये आले आणि त्यांनी लग्नगाठ बांधली.
व्यवसायाने फार्मासिस्ट असणारी विनी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न मध्ये सेटल आहे. तिने इंस्टाग्रामवरून बॉयफ्रेंड ग्लेनसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. हे कपल काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाई क्रिकेट बोर्डाच्या अवॉर्ड सेरेमनीमध्ये स्पॉट झालं होतं. ग्लेन मॅक्सवेल सध्या इंग्लंडमधील टी 20 ब्लास्टमध्ये लंकाशायर साठी खेळत आहे.