नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑस्ट्रेलिया टीमचा आणखी एक खेळाडू ग्लेन मॅक्सवेल हा आता लग्नबंधनात अडकणार असून त्याने आपल्या साखरपुड्याची घोषणा केली आहे. ग्लेन याने भारतीय वंशाच्या गर्लफ्रेंडला एन्गेनजमेंट रिंग घातली असून सोशल मीडियावर याची घोषणा करत ते लवकरच जीवनाच्या सर्वात सुंदर क्षणांचे साक्षी बनायचे आहे.
ग्लेन याने भारतीय वंशाच्या विनी रमन हिला आपला जोडीदार बनवायचे ठरवले आहे. त्याने त्याचा आणि गर्लफ्रेंडचा फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर टाकला आहे. यात विनी आपली एंगेजमेंट रिंग दाखवत असून याला रिंगच्या इमोजीची कॅप्शनही दिली आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही ग्लेन मॅक्सवेलला अभिनंदन केले असून आपल्या ट्विटर हँडलवरून शुभेच्छा दिल्या आहेत. ग्लेन आणि विनीचा फोटो शेअर करत “ग्लेन मॅक्सवेलने आत्ताच साखरपुड्याची घोषणा केली आहे. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा,” असे लिहिले आहे.
https://twitter.com/cricketcomau/status/1232619368837574656
ग्लेनचे वय ३१ वर्ष असून त्याने मानसिक त्रासामुळे क्रिकेटमधून ब्रेक घेतला होता. नंतर परत त्याने पुनरागमन केले पण त्याला दुखापत झाली. यामुळे तो संघाच्या बाहेर गेला.