नवी दिल्ली : वृत्तसंस्था – खाद्यपदार्थ वाढवण्यासाठी किशोरवयीन मुली केवळ २२ रुपयांमध्ये वेश्या व्यवसाय करत आहेत. त्याचबरोबर मुलींना काही चांगल्या स्थितीत ७० – ८० रुपये मिळत आहेत. अशी परिस्थिती दक्षिण आफ्रिकेतील काही भागांमधील आहे ज्या ठिकाणी त्यांना अन्न खाण्यासाठी सामना करावा लागतो आहे.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, मानवतेच्या कारणास्तव लोकांना मदत करणारी आंतरराष्ट्रीय संस्था वर्ल्ड व्हिजन यांनी म्हटले आहे की, उपासमारीपासून आपला जीव वाचवण्यासाठी केवळ १२ वर्षाच्या मुली अंगोला येथे वेश्याव्यवसाय करीत आहेत. संयुक्त राष्ट्रांचे म्हणणे आहे की दक्षिण आफ्रिकेतील साडेचार कोटी लोकांना उपासमारीची समस्या भेडसावत आहे. दुष्काळ, पूर आणि आर्थिक परिस्थिती याला कारणीभूत आहे.
वर्ल्ड व्हिजनने म्हटले आहे की, अंगोला आणि झिम्बाब्वेमध्ये शरीर व्यापार करणार्या मुलींच्या संख्येत वाढ झाल्याचे त्यांच्या कर्मचार्यांच्या लक्षात आले आहे. त्याचबरोबर, बालविवाहाचा धोकाही या संकटामुळे वाढला आहे. अंगोला येथील वर्ल्ड व्हिजनचे इमर्जन्सी डायरेक्टर रॉबर्ट बोल्टन म्हणाले – कदाचित येथील मुलीला सेक्ससाठी ७२ रुपये (स्थानिक चलनात ५०० क्विंजा) किंवा तिला २९ रुपये (२०० क्वानजा) देखील मिळू शकेल.
रॉबर्ट म्हणाले की, मागील वर्षात अंगोलातील अनेक धान्यांच्या किंमती दुप्पट झाल्या आहेत, त्यामुळे लोकांना ते खरेदी करणे कठीण झाले आहे. पुढचे पीक जूनपूर्वी होणार नाही, म्हणून सध्या परिस्थिती आणखी बिकट होऊ शकेल. जिम्बाब्वेबाबत केअर इंटरनॅशनल संस्थेने असेही म्हटले आहे की 14 वर्षांपर्यंतच्या मुली देह व्यापार करतात. संस्थेचे क्षेत्रीय लिंग तज्ज्ञ एवरजॉय महुकू म्हणाले – कधीकधी या मुलींना फक्त २२ रुपये मिळतात.
अॅक्शन एडचे प्रादेशिक सल्लागार चिकोंडी चबवुता म्हणाले की मलावी आणि मोजाम्बिकमध्येही मुली आणि महिलांना वेश्या व्यवसायासाठी भाग पाडले जाते. १९८१ पासून आफ्रिकेच्या काही भागात सर्वात कमी पाऊस झाला आहे. हवामान बदल देखील यामागील कारण असल्याचे संयुक्त राष्ट्रांचे मत आहे. झांबिया, जाम्बिया, मडागासकर, नामिबिया, लेसोथो आणि इस्वातीनी या आफ्रिकन देशांनाही याचा फटका बसला आहे.