बहुजननामा ऑनलाईन – बॉलीवूड अभिनेते हे फार कमी वेळा आपल्या चाहत्यांसोबत मिसळताना दिसतात. परंतु काही वेळा अश्या प्रसंगी त्यांना विचित्र अडचणींना सामोरे जावे लागते. काहींच्या उत्सुकतेला तर काहींच्या रागाला देखील झेलावे लागते. अशीच एक घटना प्रियांका चोप्रा सोबत घडली. एक पाकिस्तानी मुलगी लाईव्ह इव्हेंट मध्ये प्रियांका चोप्रावर मोठमोठ्याने ओरडू लागली. पण कलाकारांना अश्या काही परिस्थितींची सवय झालेली असते, त्यामुळे प्रियांकाने देखील हि परिस्थिती खूपच चांगल्या पद्धतीने हाताळली .
शनिवारी दुपारनंतर एका ब्यूटीकॉल लॉस एंजेलिसच्या इव्हेंट दरम्यान प्रियांका बोलत असताना हि घटना घडली. ती मुलगी प्रियांका वर ५ महिन्यांपूर्वी म्हणजेच मार्च महिन्यात केलेल्या ट्विटवरून भडकली होती. ज्या ट्विटमध्ये प्रियांका ने आपल्या भारतीय सैनिकांचे कौतुक केले होते. प्रियांका हि युनायटेड नेशन्स गुडविल अँबॅसिटर असून तिने असे आपत्तीजनक ट्विट केल्याबद्दल त्या मुलीने प्रश्न विचारण्यास सुरुवात केले.
त्या मुलीने विचारले कि, ‘तुम्ही शांतता प्रस्थपित ठेवण्यासाठी युनायटेड नेशन्स गुडविलचे अँबॅसिटर आहेत. परंतु तुम्ही तसे न करता, पाकिस्तानच्या न्यूक्लियर वॉरला भडकवण्याचे प्रयत्न करत आहात. तुम्हाला कोणत्याही पद्धतीने यामध्ये सहभाग दर्शविला नाही पाहिजे. एक पाकिस्तानी असून देखील माझ्या सारखे लाखो लोक तुमचे चाहते आहेत आणि त्यांनी तुम्हाला तुमच्या व्यवसायात मदत केली आहे.”
प्रियांका तिचे म्हणणे शांतपणे एकात असते आणि ‘म्हणते कि तुम्ही बोला मी ऐकत आहे’, हे एकूण ती मुलगी गप्प होते, प्रियांका अत्यंत शांततेत तिच्या या प्रश्नाचे उत्तर देते कि , ‘माझे खूप सारे मित्र हे पाकिस्तानचे आहेत आणि मी एक भारतीय आहे, युद्ध अशी गोष्ट नाही कि जिचे मी समर्थन करते, पण मी एक राष्ट्रभक्त आहे. त्यामुळे मी माफी मागते कि ज्यामुळे माझ्या चाहत्यांची मने दुखावली गेली असतील, जे माझ्यावर प्रेम करतात. ज्यांनी माझ्यावर प्रेम केले आहे.’
प्रियांका पुढे म्हणते कि, मला वाटते कि आपल्या प्रत्येकामध्ये एक मिडल ग्राउंड असतो, ज्यावर आपण सर्वानी चालणे गरजेचे आहे. जसे तुम्ही करत आहात. ज्या प्रकारे तुम्ही माझ्यावर आता ओरडला आहात, तश्या प्रकारे तुम्ही ओरडू नका, आपण इथे प्रेमासाठी, शांततेसाठी आलो आहोत. ”
दरम्यान , प्रियांका आपल्या त्या ट्विट मध्ये, ” जय हिंद, भारत अमर रहे !” एवढेच लिहिले होते, ज्यामुळे ती पाकिस्तानी मुलगी प्रियांका वर ओरडली.