नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात कोरोना व्हायरसच्या दुसर्या लाटेचा कहर सुरू आहे. मागील 13 दिवसांपासून रोज साडेतीन लाखांपेक्षा जास्त प्रकरणे समोर येत आहेत. या दरम्यान 1 मे पासून 18 वर्ष ते 44 वर्षापर्यंतच्या लोकांसाठी सुद्धा व्हॅक्सीनेशन अभियान सुद्धा सुरू करण्यात आले आहे. यादरम्यान सोशल मीडियावर एका मुलीचा व्हॅक्सीन घेतानाचा व्हिडिओ खुप वायरल होत आहे. मुलीने इंजेक्शन पाहून इतके नाटक केले की, डॉक्टरसुद्धा हैराण झाल्या, आणि डॉक्टरांनी मोठ्या प्रयत्नांनतर जेव्हा इंजेक्शन दिले तेव्हा मुलीला म्हटले, आता चालू पड. हा व्हिडिओ पाहून कुणालाही खो-खो हसायला येईल.
ट्विटरवर एका यूजरने हा व्हिडिओ 3 मे रोजी अपलोड केला होता, व्हिडिओत दिसत आहे की, मुलीगी खुर्चीवर बसली आहे. डॉक्टर इंजेक्शन हातात घेताच ती उठून उभी राहते आणि डॉक्टरांना एक मिनिट थांबण्यास सांगते. नर्स तिला पकडते. यानंतर ती मम्मी-मम्मी आरडू लागते. अखेर हैराण झालेल्या डॉक्टर तिला जाण्यासाठी सांगतात.
https://twitter.com/logicalkpmurthy/status/1389157857795485697
परंतु पुन्हा ती डॉक्टरांना व्हॅक्सीन देण्यास सांगते. डॉक्टर इंजेक्शन देण्यास सुरूवात करताच, पुन्हा ओरडून ती म्हणते, मम्मी तर बोलू शकते ना. डॉक्टर म्हणतात, काहीही बोलू नको, शांत बस. यानंतर डॉक्टर इंजेक्शन दिल्यावर म्हणतात – दफा हो जाओ. हा व्हिडिओ लोकांनी खुप पसंत केला आहे, आतापर्यंत त्यास लाखापेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.