राष्ट्रवादीतील ‘दिग्गज’ दुपारी ‘शपथ’ घेतात आणि रात्री मला फोन ; 50 जण भाजप प्रवेशासाठी ‘इच्छुक’, ‘या’ बड्या नेत्याचा दावा

bjp-and-ncp

नाशिक : बहुजननामा ऑनलाइन – राष्ट्रवादी पक्षातील अनेक जण दुपारी शपथ घेतात आणि रात्री मला फोन करतात. सध्या माझ्याकडे ५० लोकांची यादी आसून त्यात माजी आमदारांसोबत आजी आमदारांची देखील नावे आहेत. जे भाजपमध्ये प्रवेश घेण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे माझा दिवस हा भाजप प्रवेशाची यादी बघण्यातच जातो. असे गिरीश महाजन म्हणाले. ते नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

राष्ट्रवादीमध्ये सध्या “आम्ही पक्ष सोडून जाणार नाही” ही शपथ घेतली जात आहे. तरीदेखील दुपारी शपथ घेऊन रात्री माझ्याशी संपर्क करणाऱ्यांची यादी भरपूर मोठी आहे. भाजप पक्षात प्रवेश घेण्यासाठी खूप जण इच्छुक आहेत. याचबरोबर मला मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत भाग घेण्याची इच्छा नाही. असे स्पष्ट मत महाजन यांनी व्यक्त केले.

यावेळी महाजानदेश यात्रे संबंधीही त्यांनी माहिती दिली. यात्रेला उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. नाशिक मधील यात्रेला नरेंद्र मोदी आणि अमित शहा उपस्थित राहणार आहेत. असेही त्यांनी सांगितले.

यावेळी पावसामुळे नाशिक मध्ये निर्माण झालेल्या पूरस्थिती संदर्भात देखील बोलताना महाजन म्हणाले, नाशिक मध्ये सुरु असलेल्या या पूरस्थितीसाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. जास्त बिकट परिस्थिती असलेल्या ठिकणावरून लोकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. वेळ पडल्यास आर्मीची देखील मदत घेऊ. जायकवाडी १०० टक्के भरेल्याची शक्यता आहे. दोन ते तीन दिवसात ३० टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. मुंबई मध्ये देखील बिकट परिस्थिती आहे. त्यामुळे धोका निर्माण होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत. असेही महाजन म्हणाले.

आरोग्यविषयक वृत्त –