Girish Mahajan | संभाजीनगरमधील मविआच्या सभेला परवानगी मिळणार?, गिरीश महाजानांचे मोठे वक्तव्य
छत्रपती संभाजीनगर : बहुजननामा ऑनलाईन – छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनवमीच्या आदल्या दिवशी दोन गटात वाद (Chhatrapati Sambhaji Nagar Incident) निर्माण झाले होते. यावेळी अनेक वाहनांवर दगडफेक करुन जाळपोळीची घटना घडली होती. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) रविवारी (दि.2 एप्रिल) सभा होणार आहे. शहरात घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या सभेला परवानगी मिळणार का? असा प्रश्न उद्भवला आहे. यावर गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी मोठं विधान केलं आहे. गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
छत्रपती संभाजीनगरमधल्या किराडपुरा मध्ये समाजकंटकांनी गाड्यांची तोडफोड करत जाळपोळही केली. त्यामुळे आता सभेला परवानगी मिळणार की नाही, याबाबत गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केलेल्या विधानामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते सभा होणार असल्याचे ठामपणे सांगत आहेत.
भाजप (BJP) विरोधात महाविकास आघाडीकडून राज्यभरात सभा घेतल्या जाणार आहेत.
यातील पहिली सभा छत्रपती संभाजीनगर येथे 2 एप्रिल रोजी होणार आहे.
महाविकास आघाडीच्या सभेमुळे वातावरण बिघडत असेल तर सभा थांबवू,
पोलिसांना तसा रिपोर्ट दिल्यास किंवा सभेमुळे काही प्रश्न निर्माण होणार असतील तर प्रशासन परवानगी देणार नाही,
असे महाजन यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानावर विरोधकांच्या काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Web Title :- Girish Mahajan | chhatrapati sambhajinagar mahavikas aghadi bjp girish mahajan maharashtra politics
हे देखील वाचा :
Pune Crime News | पुणे : दोन दिवसांच्या अंतराने उच्चशिक्षित नवविवाहित दाम्पत्याची आत्महत्या
Comments are closed.