बहुजननामा ऑनलाइन – जर तुमचा पगार हा 15 हजारांपेक्षा कमी असेल आणि तुम्ही आतापर्यंत निवृत्तीनंतरचा काहीही प्लॅन केलेला नसेल तर चिंता करू नका. मोदी सरकारच्या पीएम श्रमयोगी मानधन योजना या पेंशन स्कीमची तुम्हालाही मदत मिळू शकते. यामध्ये 60 वर्षांनंतर प्रत्येक महिन्याला तुम्हाला 3000 रुपये आणि वर्षाला 36 हजार रुपये पेंशन मिळू शकते. या स्कीमअंतर्गत 18 ते 40 वर्षांमधील कोणतीही व्यक्ती सहभागी होऊ शकते. तुम्ही खूप सोप्या पद्धतीनं खातं सुरू करू शकता. विशेष म्हणजे यासाठी खूप कागदपत्रांचीही गरज भासत नाही. रोजगार मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार या स्कीमच्या माध्यमातून आतापर्यंत तब्बल 45 लाख लोक जोडले गेले आहेत.
18 वर्षीय व्यक्ती देखील या स्कीममध्ये सहभागी होऊ शकतो. जर कुणी कर्मचारी हा 18 वर्षांचा असेल तर पीएम श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत त्याला 60 वर्षांपर्यंत प्रत्येक महिन्याला 55 रुपये जमा करावे लागतील. एका दिवसाचा हिशोब केला तर 1 दिवसाला ही रक्कम फक्त 2 रुपये एवढी आहे. जर कुणी 29 वर्षांचा असेल तर त्याला पेंशन मिळवण्यासाठी 60 वर्षांपर्यंत प्रत्येक महिन्याला 100 रुपये जमा करावे लागतील. जर कुणी कर्मचारी 40 वर्षांचा असेल तर या योजनेत सहभागी झाल्यानंतर त्याला प्रत्येक महिन्याला 200 रुपयांचं योगदान द्यावं लागणर आहे. जितंक योगदान हे खातेदाराचं असेल तितकंच योगदान हे सरकारचं असेल.
काय आहेत या योजनेचे नियम ?
पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना ही असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी आहे. ज्यात वेठबिगार मजुरांसह घरकामगार, ड्रायव्हर, इलेक्ट्रीशियन आणि स्वीपर अशा प्रकारच्या सर्व कामगारांना फायदा मिळेल. पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना ही अशा असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी आहे ज्यांचा पगार महिन्याला 15000 पेक्षा कमी आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी वय 18 ते 40 असायला हवं.
कसं कराल रजिस्ट्रेशन ?
– यासाठी तुमच्याजवळ आधार कार्ड आणि बचत खातं किंवा जनधन खातं (IFSC Code सह )असणं आवश्यक आहे. सोबत तुमचा मोबाईल नंबरही गरजेचा आहे.
– पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेत रजिस्ट्रेशन पाससाठी तुम्हाला सीएससी सेंटरवर जावं लागेल.
– यानंतर तिथं आधार कार्ड आणि बचत खातं किंवा जनधन खातं जे असेल त्याची माहिती IFSC Code सह द्यावी लागेल. पुरावा म्हणून पासबुक, चेकबुक किंवा बँक स्टेटमेंट
दाखवू शकता.