बहुजननामा ऑनलाइन टीम – नवी दिल्ली : लग्नाचे आमिष दाखवत शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या तरुणाला पीडितेशी लग्न करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाला दिला. मात्र, जर त्या पीडितेशी लग्न नाही केलं तर तुरूंगात जावं लागले आणि तुरुंगात जाण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही, असेही न्यायालयाने सांगितले.
या प्रकरणातील तरुण पंजाब येथे वास्तव्यास असून, तो उच्च जातीचा आहे आणि तरूणी अनुसूचित जातीची आहे. पण पीडिता सध्या ऑस्ट्रेलिया येथे राहते. सरन्यायाधीश एस. ए. बोबडे, न्यायाधीश ए. एस. बोपन्ना आणि जस्टिस रामासुब्रमण्यम यांच्या खंडपीठाने सुनावणी केली. त्यामध्ये तरुणाला अटकेपासून दिलासा दिला. पण जर लग्न नाही केले तर तुरुंगात जाण्यापासून त्याला कोणीही थांबवू शकत नाही, असेही सांगितले.
तरुण-तरूणी या दोघांमध्ये 22 डिसेंबर, 2020 मध्ये करार झाला. यामध्ये दोघे लग्न करतील आणि त्याला दोघांचे कुटुंबियही सहमत आहेत. या करारावर सह्यादेखील आहेत सध्या तरुणी ऑस्ट्रेलिया येथे आहे. जेव्हा ती भारतात येईल तेव्हा दोघांनी लग्न करण्यास सांगितले.
अंतरिम दिलासा पण…
या प्रकरणात तरुणाला अंतरिम दिलासा दिला आहे. मात्र, या तरुणाने त्याच तरुणीशी लग्न केले नाही तर त्याला तुरुंगात जावे लागणार आहे.
तरुणीचे अश्लिल फोटो काढले
दरम्यान, ही पीडित तरूणी अनुसूचित जाती वर्गातील असल्याने तिने लग्न शक्य नसल्याचे सांगितले. मात्र, त्या तरुणाने लग्नात कोणतीही अडचण येणार नसल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्याने शारीरिक संबंधासाठी तिच्यावर सातत्याने दबाव टाकला पण तिच्याकडून नकार दिला जात होता. मात्र, एकदा त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि त्याचे अश्लिल फोटोही काढले.
लग्नास टाळाटाळ
शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर तरुण लग्नास टाळाटाळ करू लागला. त्यानंतर अखेर गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात तरुणाविरोधात बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
उच्च न्यायालयाकडून जामिन फेटाळला
गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या तरुणाने पंजाब आणि हरियाणा न्यायालयात अंतरिम जामिनासाठी याचिका दाखल केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने ती फेटाळली.