पुणे : बहुजननामा ऑनलाईन – उदयनराजे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत ‘छत्रपती शिवाजी महाराजांची शिकावण पाळत असून आम्ही सत्तेच्या कधीही मागे गेलो नाही. जनतेसाठी खासदारकी फुकून टाकली. असून आता वन मॅन शो आहे,’ असे म्हणाले आहेत. तसेच त्यांनी आज पत्रकार परिषदेत ‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ या पुस्तकावर टीका असून पुस्तक मागे घेतले नसेल तर मागे घ्यायला लावू आणि संबंधितांवर कारवाई करायला लावू, असे उदयनराजे म्हणाले.
तसेच शिवसेनेचे संजय राऊत यांनी पुस्तकावरून भाजपवर टीका करत भाजपमध्ये गेलेल्या शिवरायांच्या वंशजांनी भूमिका स्पष्ट करावी, असे म्हणाले होते. त्याला उत्तर देत उदयनराजे यांनी राऊतांवरही अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. माझ्या बुद्धीला जे पटत नाही, ते मी करत नाही. त्यामुळेच निवडून आल्यानंतरही खासदारकीचा राजीनामा दिला. माझे नाते सर्वसामान्य लोकांसोबत असून त्यांच्यासाठी मी जीवही द्यायला तयार आहे. आम्ही काय करायचे ते इतरांनी सांगू नये, असे म्हणत त्यांनी राऊतांवर टीका केली आहे.