मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते की, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी मुंबईचा जुना डॉन करीम लाला यास भेटल्या होत्या. राऊत यांनी 15 जानेवारी, 2020ला एका कार्यक्रमातील मुलाखतीमध्ये म्हटले होते की, त्यावेळी अंडरवर्ल्ड ठरवत होते की, मुंबईचा पोलीस आयुक्त कोण होणार, मंत्रालयात कोण बसणार. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण सध्या तापले आहे.
करीम लाला, मस्तान मिर्झा उर्फ हाजी मस्तान मुंबईचा पावरफुल माफिया डॉन होता, ज्यास मुंबईचा पहिला माफिया डॉन संबोधले जाते. करीम लाला 1960 पासून ऐंशीच्या दशकापर्यंत सक्रिय होता. मुंबईमध्ये करीम लालाशिवाय पान हलत नव्हते. त्याच्या गँगचे नाव पठाण गँग होते. करीम लालाचे महिला डॉन गंगूबाईशी जवळचे नाते होते.
गंगूबाई, मुळ गुजरातच्या काठियावाड येथील राहणारी होती. तिचे खरे नाव गंगा हरजीवनदास काठियावाड़ी होते. 16 व्या वर्षांची असताना गंगूबाईचे आपल्या वडीलांच्या 29 वर्षीय अकाऊन्टटवर प्रेम जडले. गंगूबाईला अभिनेत्री बनायचे होते. तिला अभिनेत्री बनण्याचे स्वप्न दाखवून अकाऊन्टटने तिच्याशी लग्न केले. आणि दोघेही पळून मुंबईत आले. परंतु, नंतर तिचा पती फसवा निघाला. त्याने गंगूबाईला मुंबईच्या कमाठीपुरा रेड लाइट परिसरात अवघ्या 500 रुपयात विकले.
हुसैन जैदी यांचे पुस्तक माफिया क्विन ऑफ मुंबई नुसार, त्याच दरम्यान मुंबईमध्ये माफिया डॉन करीम लालाच्या गँगच्या एका माणसाने गंगूबाईवर बलात्कार केला. करीम लालाच्या घरी रोज दरबार भरत असे. ज्यामध्ये तो लोकांची गर्हाणी ऐकत असे आणि समस्या सोडवत असे. तो सर्वांचा मसीहा झाला होता. त्याच्या दरबारात सर्व समाज आणि सांप्रदयाचे लोक मदतीसाठी येत असत. त्याच्याकडे गरीब, श्रीमंत असा भेदभाव नव्हता.
गंगूबाईने सुद्धा करीम लालाची भेट घेतली आणि त्याच्याकडे न्याय मागितला. गंगूबाईने करीमला राखी बांधली होती, आणि भाऊ मानले होते. करीमची बहिण झाल्यानंतर आता गंगुबाईची पॉवर वाढली होती. गंगूबाई मुंबईच्या कमाठीपुरा रेड लाइट परिसरात सेक्स रॅकेट आणि अनेक कोठे चालवत होती. ती सेक्स वर्करसाठी आवाज उठवत होती. करीम लालाचा तिच्या डोक्यावर हात होता. ज्यामुळे ती मुंबईची महिला डॉन बनली होती.
गंगूबाईच्या भूमिकेत आलिया भट्ट
संजय लीला भन्साळींचा चित्रपट गंगूबाई काठियावाड हा हुसैन जैदी यांच्या पुस्तकावर अधारित आहे. चित्रपटात गंगूबाई काठियावाडची भूमिका आलिया भट्ट करत आहे. हा चित्रपट 11 सप्टेंबर 2020ला प्रदर्शित होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार चित्रपटात करीम लालाचाही उल्लेख आहे.
Visit : Bahujannama facebook page –
- ‘अॅपल टी’चे हे 4 फायेद वाचून व्हाल थक्क! जाणून घ्या ‘रेसिपी’
- संधिवाताची ‘ही’ आहेत 10 लक्षणे आणि 11 कारणे, जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी
- रंग आणि आरोग्याचे ‘कनेक्शन’ ! जाणून घ्या ‘या’ 10 रंगांचे तुमच्यावरील परिणाम
- ‘या’ 6 पद्धतीने करा तुमच्या आयुष्यातून तणावाला हद्दपार
- ‘विराट’ आणि ‘सेरेना’नेही केला होता फॉलो, ‘वेगन डाएट’चे हे 6 फायदे जाणून घ्या
- झोपल्यावर घाम येत असल्यास ‘या’ 9 कारणांचा विचार करा