पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पुण्यातील एका व्यावसायिकाला गुन्हा दाखल न करण्यासाठी 50 लाख रुपयांची खंडणी मगितल्याप्रकरणी मंदार सुरेश वाईकर (वय 42, रा. बिबवेवाडी) याला गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री अटक केली. दरम्यान यातील प्रमुख भूमिका असलेली गँगस्टर छोटा राजनची पुतणी प्रियदर्शनी निकाळजे हिचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. याापूर्वी 25 लाख रुपये घेेेत असताना लष्कर भागाात शूटर धीरज बाळासाहेेब साबळे (25) याला पकडले होतेे. याबाबत लष्कर पोलीस ठाण्यात राजेश जवळेकर (वय 48) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांच्या दुसर्या पत्नी व मेहुणी यांच्यात वाद सुरू आहेत. दरम्यान छोटा राजनची पुतणी प्रियदर्शनी ही एका महिला संघटनेची अध्यक्षा आहे. तुमच्याबाबत पत्नी व मेव्हुणीने तक्रार केली आहे. त्यानुसार, मी माझ्या लेटरहेडवर भारती विद्यपीठ पोलीस ठाण्यात तुमच्याविरोधात तक्रार अर्ज दिला आहे. जर गुन्हा दाखल करायचा नसेल तर, 50 लाख रुपयांची खंडणी द्यावे. त्यातील 25 लाख मी घेणार असून, उर्वरित 25 लाख पत्नी, मेव्हुणी व मंदार याला देणार असल्याचे सांगितले.
खंडणी न दिल्यास पिस्तूल फिर्यादींवर रोखत 10 गोळ्या झाडून मारण्याची धमकी दिली. मी छोटा राजनची सख्खी पुतणी आहे. जिव प्यारा असेल तर मी सांगितलेले ऐक. त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील अशा धमक्या देऊन वारंवार खंडणीची मागणी केली. एकाला पोलिसांनी 25 लाख घेताना पकडले होते. तर पुतणी निकाळजे आणि मंदार वाईकर पसार झाले होते. त्यांचा शोध घेण्यात येत होता. त्यानुसार रात्री मंदार हा बुधवार पेठ येथील श्रीकृष्ण टॉकीजजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्याला मध्यरात्री सापळा रचून अटक करण्यात आली.