बडोदा : वृत्तसंस्था – एका 19 वर्षीय तरुणीने आधल्या दिवशी रात्री मित्राबरोबर दारुची पार्टी केली होती. त्यानंतर पार्टीतील मित्रांनीच तिच्यावर (Gangrape) सामुहिक बलात्कार (Gangrape) केल्याचा आरोप करत तिने आत्महत्या केली आहे. गुजरातच्या बडोद्यामध्ये शुक्रवारी (दि. 11) सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणी बडोद्यामधील लक्ष्मीपुरात भागात राहत होती. ती एका खासगी कंपनीमध्ये कामाला होता. तिच्या आईचे 6 महिन्यांपूर्वीच निधन झाल आहे. मृत तरुणीने आधल्या दिवशी रात्री घरात 2 तरुण आणि एका तरुणीबरोबर दारुची पार्टी केली होती. पार्टीमध्ये जास्त दारु प्यायल्यानंतर या तरुणीला प्रचंड नशा झाली होती. नशेमध्ये बुडालेल्या अवस्थेत तिचा गैरफायदा घेत तिच्यावर दोघा मित्रांनी सामुहिक बलात्कार केल्याचा आरोप तिने केला होता. तरुणीने सकाळी तिच्या मित्राला फोन केला अन् संपूर्ण घटनेबाबत सांगितल. तसेच तिने आत्महत्या करण्यापूर्वी या सगळ्याचा व्हिडिओ देखील तयार केला. त्यानंतर तिने थेट आत्महत्येचे पाऊल उचललं आहे.
कृपया हे देखील वाचा:
1 वर्षाच्या वॉरंटीसह येथे मिळत आहे जुनी Wagon R कार ! जाणून घ्या किती खर्च करावा लागेल
‘महाविकास’मध्ये ‘तणाव’; राष्ट्रवादीचं मिशन 2024 तर काँग्रेसचा स्वबळाचा नारा
Pune Crime News | साई पॅलेस लॉजवर सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 5 महिलांची सुटका
रिलायन्स इंडस्ट्रीजने बंद केले जामनगरचे युनिट, जाणून घ्या कारण