भुसावळ (Bhusawal) :बहुजननामा ऑनलाइन – अल्पवयीन मुलीच्या (minor girl) घरात शिरुन तिच्यावर सामुहिक बलात्कार (Gang rape) करताना त्याचा व्हिडिओ काढून तो व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या तीन वर्षांपासून या अल्पवयीन मुलीला ते व्हिडिओ व्हायरल (Video viral) करण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार (Gang rape) करीत होते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या मुलीने फिर्याद दिली आहे. त्यातील चार आरोपी अल्पवयीन असून एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
रेल्वे नॉर्थ कॉलनी परिसरातील बंद रेल्वे क्वॉर्टरमध्ये हा प्रकार २०१८ पासून १२ जुलै २०२१ दरम्यान सुरु होता. शहर पोलिसांनी सुबोध यशोदे (Subodh Yashode) (वय २०) याला अटक केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
या पिडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार ही मुलगी घरात असताना एका मुलाने रुमच्या मागील दरवाजाची कडी बाहेरुन बंद केली. त्यानंतर दुसर्याने दरवाजाची कडी आतून बंद केली. सुबोध यशोदेसह इतर तिघा अल्पवयीन मुलांनी तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. या अत्याचाराचा व्हिडिओ करुन तो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. हा व्हिडिओ आता व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी चारही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
web title: Gang Rape | Shocking! Gang rape of a minor girl in Bhusawal.
Earthquake | काही तासात देशात 5 ठिकाणी भुकंपाचे धक्के; बिकानेर, मेघालय तीव्र धक्क्याने हादरला
Pune Crime | चाकण एमआयडीसीमधील ATM चा भीषण स्फोट; पहाटेच्या सुमारास घडला प्रकार