Gang Rape In Bopdev Ghat Pune | बोपदेव घाट गॅंग रेप केस : आरोपींची माहिती देणार्‍यांना 10 लाखांचे बक्षीस जाहीर

October 7, 2024

पुणे : Gang Rape In Bopdev Ghat Pune | बोपदेव घाटात तरुणीवर अत्याचार करणार्‍या त्या तीन नराधमांची माहिती काढण्यात पुणे पोलिसांना (Pune Police) अपयश आल्यानंतर आता या आरोपींची माहिती देणार्‍यांस पुणे पोलिसांनी १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. आरोपींच्या शोधासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत आहे.

बोपदेव घाट परिसरात गुरुवारी रात्री तरुणी मित्राबरोबर फिरण्यास गेली होती. यावेळी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास तिघा नराधमांनी या तरुणीच्या मित्राला बांधून ठेवले. त्यानंतर या तरुणीवर एका मागोमाग एकाने बलात्कार केला. या घटनेची शुक्रवारी पहाटे ५ वाजता पोलिसांना माहिती झाली. तेव्हापासून आरोपींच्या शोधासाठी गुन्हे शाखेकडून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

याबाबत सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma) यांनी सांगितले की, आरोपींची माहिती देणार्‍यास १० लाखांचे बक्षीस देण्यात येईल. त्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे. या घटनेच्या दरम्यान बोपदेव घाटातून प्रवास केलेल्या ३ हजार मोबाईलधारकांची माहिती आणि सीसीटीव्ही चित्रीकरण संकलित केले आहे. या डाटाचे एआय तंत्रज्ञानाचा सहाय्याने तांत्रिक विश्लेषण करण्यात येत आहे. पुण्यासह सोलापूर व इतर जिल्ह्यांमध्ये आरोपींचा शोध घेतला जात आहे.

पोलिसांच्या श्वान पथकाने घटनास्थळाचा शोध घेतला असून आरोपींनी मारहाण करण्यासाठी वापरलेला बांबु आणि रक्त आढळून आले. पोलिसांची रक्ताचे नमुने आणि इतर साहित्य जप्त केले असून तो तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याचे शर्मा यांनी सांगितले.