बहुजननामा ऑनलाइन टीम – जगातील सर्वात मोठी लूट करणाऱ्या एका टोळीने जर्मनीतील ऐतिहासिक ड्रेस्डेन ग्रीन वॉल्ट म्युझियममधून सुमारे 7800 कोटींचे दागिने चोरले आहेत. चोरट्यांनी अवघ्या 1 फूट गॅपमधून आतमध्ये प्रवेश केला. ही घटना सोमवारी सकाळ घडली आहे.
चोरट्यांनी प्रथम म्युझियमच्या अलार्म सिस्टमला आग लावण्याचा प्रयत्न केला. यानंतर खिडकीत फक्त 1 फूटचे गॅपच्या सहाय्याने चोरांना म्युझियममध्ये प्रवेश करण्यात यश आले.
हातात टॉर्च घेऊन चोरट्यांनी आत जाऊन लूटमार केली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहेत, परंतु चोरांचे चेहरे दिसत नाहीत. जर्मनीचे ऐतिहासिक ड्रेस्डेन ग्रीन वॉल्ट म्युझियम जगातील सर्वात जुन्या म्युझियममध्ये मोजले जाते. अलार्म सिस्टिम बिघडल्यामुळे अधिकाऱ्यांना उशिरा दरोडा पडल्याची माहिती मिळाली.
चोरांनी 18 व्या शतकातील दागदागिने किंमतीचे तीन सेट लुटले. खुल्या बाजारात ही दागिने विक्री करणे अशक्य आहे, असे जर्मन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, चोरट्यांना फक्त काचेचा एक सेट तोडण्यात यश मिळाले. हे दागिने डझनभर रत्नांनी बनवले होते.
म्यूझिअमने चोरट्यांना आवाहन केले आहे की, हे दागिने तोडू किंवा वितळवू नका. ते दागिने ऐतिहासिक मोलाचे आहेत आणि बरीच किंमत असून चोरट्यांनी सुमारे 30 वर्षांपूर्वी बोस्टनमधील गार्डनर म्युझियममधून ३५८० कोटी रुपयांचा माल लुटला. असा समजले आहे की, ही आतापर्यंतची सर्वात मोठी लूट आहे.
ड्रेस्डेन ग्रीन वॉल्ट म्यूझियममधून पोलिसांनी दरोड्याचा तपास सुरू केला आहे आणि चोरट्यांबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. पूर्वी हे मुझियम सर्वात सुरक्षित मुझियम असल्याचे म्हटले जात होते. यामुळे, चोरांची टोळी दरोडा टाकण्यास यशस्वी कशी झाली ? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.