बहुजननामा ऑनलाईन – कुत्र्याच्या हल्ल्यात एक संशयित बलात्कारी नपुंसक झाल्याची घटना मेक्सिको सिटीत घडली आहे. एका टोळीने या संशयित बलात्कारी व्यक्तीला पकडून कुत्र्यामार्फत हल्ला करविला. यात तो नपुंसक झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मेक्सिकोमध्ये एका टोळीने एका संशयित बलात्कारी व्यक्तीला पकडले आणि त्याचे हात पाय बांधण्यात आले. त्याच्यावर कुत्र्याद्वारे हल्ला करविला. या हल्ल्यात कुत्र्याने त्याच्या त्याच्या गुप्तांगावर चावा केल्यामुळे तो नपुंसक झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. यात एका व्यक्तीचे कपडे काढण्यात आले, हात पाय बांधून त्याच्यावर एका कुत्र्याद्वारे हल्ला करविण्यात आला. दरम्यान गेल्या महिन्यात एका तीस वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीने मेक्सिको शहरातील एका महिलेवर लैंगिक अत्याचार केले होते.
कुत्र्याच्या हल्ल्यादरम्यान, संशयित स्वत: ला सोडण्यासाठी मदत मागत राहिला. हल्ला करणाऱ्या टोळीतील व्यक्तीनेही या घटनेचा व्हिडिओ बनविला होता. मात्र हल्ल्यानंतर बलात्कार करणार्या संशयिताचा जीव वाचला की नाही हे अद्याप स्पष्ट झाले नाही. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, मेक्सिकन गुन्हेगारी टोळ्यांकडून अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मेक्सिकोमध्ये खुनाचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. यावर्षी केवळ अर्ध्या वर्षात १७ हजार खूनाच्या घटना घडल्या आहेत.