Ganesh Bidkar | भाजप नेते गणेश बिडकर यांचे पुणे महापालिकेतील सभागृह नेतेपद उच्च न्यायालयाकडून रद्द

Ganesh Bidkar | BJP leader Ganesh Bidkar s House leadership in Pune Municipal Corporation canceled by High Court

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – महापालिकेच्या (PMC) इतिहासात प्रथमच सभागृह नेतेपदी नियुक्ती झालेल्या स्वीकृत नगरसेवक गणेश बिडकर (Ganesh Bidkar) यांना उच्च न्यायालयाने (High Court) त्या पदासाठी अपात्र ठरविले (Disqualified) आहे. 20 सप्टेंबर 2021 पासून अंतिम सुनावणीसाठी प्रलंबित असलेल्या याचिकेवर सोमवारी निकाल देण्यात आला. स्वीकृत नगरसेवक गणेश बिडकर (Ganesh Bidkar) यांची सभागृह नेतेपदी झालेली नियुक्ती महापालिका कायद्यातील कलम 19 (1) ए नुसार योग्य नसल्याचे सांगून त्यांचे सभागृह नेतेपद उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) रद्द केले.

पुणे महापालिकेमध्ये Pune Municipal Corporation (PMC) बहुमतात असलेल्या व 99 नगरसेवकांची ताकद असताना भाजपने (BJP) एका स्वीकृत नगरसेवकाला सभागृह नेतेपद दिले आहे. ही नियुक्ती चुकीच्या पद्धतीने केली असल्याचा आरोप करीत अपक्ष नगरसेवक रवींद्र धंगेकर (Corporator Ravindra Dhangekar) यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल (Filed a Petition) केली होती. 20 सप्टेंबर 2021 रोजी अंतिम निर्णयासाठी ही याचिका होणार होती. परंतु ती अद्यापपर्यंत प्रलंबित होती. या याचिकेवर अंतिम सुनावणी (Hearing) झाली असून न्यायालयाने गणेश बिडकर (Ganesh Bidkar) यांना सभागृह नेतेपदी अपात्र ठरविले असल्याचा निकाल दिला आहे, अशी माहिती रवींद्र धंगेकर यांचे वकील ॲड. कपिल राठोड (Adv. Kapil Rathore) यांनी दिली.

यासंदर्भात गणेश बिडकर यांनी सांगितले की, न्यायालयाची ऑर्डर मला मिळालेली आहे. न्यायालयाने अपिल करण्यासाठी 2 आठवड्यांची मुदत दिली असून मी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाद मागणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील निर्णय होईपर्यंत सभागृह नेता म्हणून स्मार्ट सिटी कंपनी (Pune Smart City) आणि अटल बिहारी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय ट्रस्ट च्या बैठकीला उपस्थित राहणार नाही.

Web Title :- Ganesh Bidkar | BJP leader Ganesh Bidkar s House leadership in Pune Municipal Corporation canceled by High Court

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Protein Veg Food | ‘या’ 5 व्हेजिटेरियन वस्तूंमध्ये ‘चिकन लेगपीस’पेक्षा जास्त प्रोटीन, डाएटमध्ये करा समावेश

Fatty Liver Symptoms | लिव्हर खराब झाल्यास तोंडातून येते भयंकर दुर्गंधी, लवंग-वेलची खाण्याऐवजी ताबडतोब जा डॉक्टरकडे

Pune Crime | दुर्दैवी ! शौचालयाची टाकी साफ करताना चार तरुणांचा मृत्यू; पुण्याच्या लोणीकाळभोर परिसरातील घटना