मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – शिंदे गटाला केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. हे पद शिंदे गटात नुकतेच सहभागी झालेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) तसेच बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच केंद्रीय मंत्रीपद मिळण्याच्या हेतूनेच खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांनी शिंदे गटात (Eknath Shinde Group) प्रवेश केल्याचंही बोललं जात आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (HM Amit Shah)
यांच्याकडे दोन केंद्रीय मंत्रिपदाच्या (2 Central Ministers) आणि दोन राज्यपाल (2 Governer) पदाची मागणी केली आहे. आता शिंदे गटाची एक मागणी पूर्ण होताना दिसत आहे.
अमित शाह यांनी मंत्रिपदांची मागणी मान्य केल्याची माहिती मिळत आहे. त्यातील एक पद गजानन कीर्तिकरांना
(Gajanan Kitikar) मिळेल अशी चर्चा होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
(Devendra fadanvis) यांच्यात सोमवारी रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर बैठक झाली होती.
यावेळी दोघा नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, याकडेही सर्वांचं लक्ष लागले आहे.
Web Title :- Gajanan Kirtikar | balasahebanchi shivsena mp gajanan kirtikar likely to get cabinet ministry in central government amit shah eknath shinde maharashtra political news
हे देखील वाचा :
Shahrukh Khan | ‘त्या’ वक्तव्यावर शाहरुख खानने दिले स्पष्टीकरण; म्हणाला…