Fursungi Pune Crime News | पुणे: पती बाहेरगावी गेले असताना विवाहितेचा खून ! घरातील बेडमधील कपडे ठेवण्याच्या बॉक्समध्ये आढळला मृतदेह, प्रचंड खळबळ

पुणे : Fursungi Pune Crime News | पती बाहेरगावी गेले असताना त्याच्या पत्नीचा खून करुन तिचा मृतदेह घरातील सोफाकमबेडच्या बॉक्समध्ये ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. (Murder Of Married Woman)
स्वप्नाली उमेश पवार (वय २४, रा. हुंडेकर वस्ती, फुरसुंगी) असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे. ही महिला घरी बेडमध्ये बेशुद्धावस्थेत मिळून आल्याचे पोलीस नियंत्रण कक्षाला कळविण्यात आले होते. फुरसुंगी बीट मार्शल (Fursungi Police) यांना ते कळविण्यात आले. त्यानंतर घटनास्थळी रात्रपाळीचे पोलीस अधिकारी विनोद पवार, सहायक पोलीस निरीक्षक जाधव, पोलीस उपनिरीक्षक खंदारे यांनी भेट दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिचा पती उमेश पवार (वय ३६, रा. लव्हेगाव पो. अकुलगाव, ता. माढा, जि. सोलापूर) याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली. उमेश पवार हा उबर टॅक्सीचालक आहे. त्याला बीड जिल्ह्यातील केज येथील भाडे लागल्याने ८ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजता तो गाडी घेऊन निघून गेला होता. त्याच रात्री तो भाडे सोडून परत आला. तेव्हा त्याच्या घराला बाहेरुन कडी होती. त्याने दरवाजा उघडून घरात पाहिले तर पत्नी दिसून आली नाही. त्याने मोटारसायकलवरुन परिसरात पत्नीचा शोध घेतला़ पण ती सापडली नाही. त्याने घरातील दागिने, पैसे व तिचा मोबाईल पाहिला असता तोही मिळून आला नाही. त्यानंतर त्याने सोफा कम बेडमध्ये घरातील दागिने व सोने आहेत का हे पाहण्यासाठी बेड उघडल. तेव्हा त्याला धक्का बसला. आतमध्ये त्याची पत्नी बेशुद्ध अवस्थेत मिळाली. त्याने तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला. पोलिसांनी तिला रुग्णालयात नेले. परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यु झाला होता. घटनास्थळावर पोलिसांचे डॉग स्कॉड, फिंगरप्रिंट पथक आले असून ते शोध घेत आहेत.
याबाबत फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे (PI Mangal Modhave) यांनी सांगितले की, महिलेच्या गळ्याजवळ जखमा आहेत. अद्याप शवविच्छेदन झाले नसल्याने तिचा मृत्यु नेमका कसा झाला हे अद्याप समजू शकले नाही.
Comments are closed.