मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या एका 16 वर्षीय तरुणीवर तिच्याच 7 मित्रांनी सामुहिक बलात्कार (gangrape) केल्याची धक्कादायक घटना मुंबईतून समोर आली आहे. मुंबईतील मालवणी भागात सोमवारी (दि. 31) रात्री ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांना अटक केली असून 7 व्या आरोपीचा शोध सुरू आहे.
पीडित मुलीच्या तक्रारीवरून सामूहिक बलात्कार gangrape आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा आरोपींविरोधात दाखल केला आहे. आरोपींपैकी एक तिचा इन्स्टाग्रामचा मित्र होता. तर बाकी तिच्या मित्राचे मित्र होते. सर्व आरोपींचे वय 18 ते 23 वयोगटातील आहेत.
मालवणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरूणीचे इन्स्टाग्रामवर अनेक मित्र होते. यापैकी मालवणी येथे राहणाऱ्या मित्राचा वाढदिवस होता. त्याने पिडित तरुणीला वाढदिवसाच्या पार्टीसाठी बोलावले होते. आई वडिलांपासून लपून तरूणी पार्टीला गेली होती. घरातून जाताना तिने घराचा दरवाजा बाहेरून बंद केला होता. ज्यावेळी मुलगी रात्री घरी परतली नाही. त्यामुळे कुटुंबाने ती बेपत्ता झाल्याची तक्रार मालवणी पोलीसात दिली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पीडित युवती घरी आली. त्यावेळी ती पोटात खूप दुखत असल्याचे आईला सांगितले. घरच्यांनी तिला पोटात दुखण्याचे कारण विचारले असता तिने उडवाउडवीची उत्तर दिली. त्यानंतर पोलिसांनी घरी येऊन चौकशी केली असता तिने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. मित्रांनी माझ्यावर गँगरेप gangrape केल्याचे तरुणीने सांगितले. एकदा नव्हे तर दोनदा तिच्यावर बलात्कार झाल्याचे पीडितेने पोलिसांनी सांगितले. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.