बहुजननामा ऑनलाइन टीम – शिरुर तालुक्यातील एक धक्कादायक(Fraud) प्रकार एका तोतयाने मी पोलिस आहे, तुला कामाला लावीन, कोणत्याही गुन्हात(Fraud) अडकवीन..”. अशी दमदाटी करीत कापड दुकानदाराला धमकाविणा-यास शिरुर पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे.
तर याबाबत मंगेश सुभाष साबळे यांनी फिर्याद दिली असून रमाकांत मारुती करपे(रा.गुनाट) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी मंगेश साबळे यांचे न्हावरे येथे कापड दुकान असून दि.१३ रोजी साबळे यांच्या दुकानात आलेल्या व्यक्तीने, मी पोलिस आहे, कापरे साहेबांनी तुमच्या दुकानात चांगले कपडे मिळतात असे सांगितले व कपडे देण्यास सांगितले.यावेळी साबळे यांनी दुकानातील कपडे दाखविल्यानंतर बिलाबाबत विचारणा केली असता,आरोपीने मी पोलिस आहे,तुला कामाला लावीन असे सांगुन साबळे यांच्याकडुन धमकावुन १५०० रु घेउन दुकानातुन पळ काढला. यावेळी सदर घटना साबळे यांनी सांगताच शिरुर पोलिसांनी सापळा रचुन आरोपीला अटक केली.
सदर आरोपीने यापुर्वीही अशाच प्रकारे नागरिकांची फसवणुक केली असल्याची शक्यता व्यक्त केली जात असुन पुढील तपास शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रविन खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर पोलिस करत आहेत.