दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली येथील हजरत निजामुद्दीन परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. तेथील एका व्यक्तीकडून शायना नावाच्या महिलेवर गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीय. त्या महिलेसह तिच्या नोकरावर सुद्धा गोळ्या झाडल्या आहेत. या प्रकरणावरून परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेत शायना या महिलेचा मृत्यू झाला, तर तिचा नोकर जखमी अवस्थेत आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही घटना मंगळवारी ( दि. २७) घडली आहे.
अधिक माहितीनुसार, २९ वर्षीय शायनाची या परिसरात अधिक दहशत होती, मात्र शायनाची हत्या तिच्या चौथ्या पतीनेच केलीय. तिची हत्या झाल्याचे समजताच तेथील लोकांना पटत नव्हतं. वसीम असे तिच्या चौथ्या पतीचे नाव आहे. गोळ्या झाडता वेळी तिचा नोकर बचाव करण्यासाठी पुढं आला तेव्हा वसीमने त्याच्यावरही गोळी झाडली. तर मृत्यू झालेली शायना ही महिला आहे कोण बघा.
शायना दिल्लीच्या ड्रग व्यापारातील एक प्रसिद्ध नाव आहे. यावरून तिला दिल्लीमध्ये ड्रग क्वीन म्हणतात. तिने एक नव्हे तर ४ लग्ने केली होती. पहिला आणि दुसरा पती तिला सोडून बांग्लादेशात गेल्याने, तिने दिल्लीतील ड्रग डीलर किंग शराफत शेखसोबत लग्न केलं. त्याला दिल्ली- NCR मध्ये ड्रग लॉर्डच्या नावानेही ओळखलं जातं. त्यानंतर त्याला पोलिसांनी कोठडीत टाकलं. परत शायनने काही दिवसांनी वसीम सोबत लग्न केलं. लग्न होऊन काही काळ झाला इतक्यात शायनाला मादक द्रव्यांच्या तस्करी प्रकरणात दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आली. शराफत शेख आणि त्याची पत्नी शायना दोघेही तिहाड जेलमध्ये होते.
यानंतर शायना जेलमध्ये होती. नंतर तिचा चौथा पती वसीमचे तिच्या मोठ्या बहिणी सोबत जमले. मोठी बहीण रेहाना आणि वसीम एकत्र राहू लागले होते. तेव्हा शायना ८ महिन्यांची गर्भवती होती. त्यानंतर शायनाला पॅरोलवर सोडण्यात आलं होतं. ती जेलमधून बाहेर आली आणि वासिमच्या वागण्यात बदल झाल्याचे समजताच, मनात तिला सजल की वसीम आणि रेहाना यांच्यात प्रेम सुरु आहे. यावरून त्या दोघांचे भांडण झाले. प्रेमात अडथळा निर्माण करत आहे यावरून वसीमने मंगळवारी सकाळी ११ च्या दरम्यान शायनावर गोळ्या झाडल्या नंतर तिच्या नोकरावर झाडल्या. या घटनेवरुन वसीम स्वतः पोलिसांना कबुल झाला आहे. त्याला पोलिसांनी अटक केलीय. अधिक तपास पोलीस करीत आहेत.