मुंबई : बहुजननामा ऑनलाईन –दिलीप कांबळे यांनी वाईन शॉपचा परवाना मिळवून देतो असे आमीष दाखवून तब्बल २ कोटी रुपयांची फसवणूक केली. असा खबळजनक आरोप विकास चव्हाण यांनी तत्कालिन राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सध्या सामाजिक न्यायमंत्री पदावर असलेल्या दिलीप कांबळेयांच्यासह चौघांवर सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी माझी फसणूक केली असा दावा विकास चव्हाण यांनी केला आहे. औरंगाबाद कोर्टाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील एक आरोपी दिलीप काळभोर याचा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज देखील जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी फेटाळला आहे. फसवणूक केल्याप्रकरणी विलास चव्हाण यांनी तक्रार दिली होती.