बहुजननामा ऑनलाईन टीम : इंदोरमधून वॉट्सऍप वर सट्टा चालवणाऱ्या ४ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे लोक वॉट्सऍपवर एकाच वेळी १ हजार लोकांना भाव सांगून सट्टा खेळण्यास प्रवृत्त करीत होते. आरोपींजवळून २० हजारांची रोकड, ११ मोबाईल फोन, सट्टयासंदर्भातील भाव , रजिस्टर- डायरी, बनावट सिमकार्ड आणि करोडो रुपयांच्या सट्टयाच्या पावत्या मिळाल्या आहे.
एएसपी क्राईम ब्रांच अमरेंद्रसिंग चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार सुनील (३२) वडील नानूराम कुमावत राहणार विराट नगर मुसखेडी, राहुल २० वडील कैलास कुमावत रहिवासी राजश्री पॅलेस टिळक नगर, जयपाल (३५) बनेसिंग सोलंकी, अमरीश (४०) वडील छगनलाल राठोड, राहणार तिलक नगर अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी वॉट्सऍपवर एकाच वेळी १ हजार लोकांना सट्टयाचे भाव सांगत आणि ओके असे उत्तर येताच पुढील सौदा करत असे, त्यांच्याजवळील जप्त केलेले ११ मोबाईल अधिक तपासासाठी पाठविण्यात आलेले आहे.
आरोपी दिवसाला लाखोंचा कारभार करीत असे, सुनील हा मुख्य आरोपी आहे. मागच्या वर्षीच आझाद नगर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. परंतु जेलमधून सुटका झाल्यानंतर त्याने पुन्हा हा व्यवसाय करण्यास सुरुवात केली. तो वंदना नगर येथे भाड्याच्या खोलीत राहत होता. आरोपी राहुल कुमरावत सुनीलचा मित्र आहे. पैशांसाठी त्याने सुनीलची या धंद्यात साथ दिली. तसेच जयपाल सोलंकी हा देखील गेल्या पाच महिन्यांपासून याच्या सोबत काम करत होता. अमरीश सुट्ट्या जिंकणाऱ्यांना रोख रखमेसोबतच गूगल पे, फोन पे, पेटीएम द्वारे पैसे देत असे.
Visit : bahujannama.com