ठाणे : बहुजननामा ऑनलाईन – शिवसेनेचे माजी आमदार (Shivsena) सूर्यकांत देसाई यांचे निधन (Former MLA Suryakant Desai Passed Away ) झाले आहे. देसाई यांना उपचारासाठी एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात नेत असताना वाटेत रुग्णवाहिका बंद पडली. देसाई यांना वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचे डोंबिवलीत (Former MLA Suryakant Desai Passed Away) निधन झाले.
शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत देसाई यांच्यावर डोंबिवलीमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतु त्या हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर नसल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात येत होते. दुसऱ्या रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच रुग्णवाहिका (Ambulance) बंद पडली. त्यांच्या कुटुंबीयांनी रुग्णवाहिका ढकलून रुग्णालयापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही आणि उपचाराअभावी देसाई यांचा मृत्यू झाला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
देसाई यांची ऑक्सिजन लेव्हल 60 पर्य़ंत होती. त्यांना ममता रुग्णालयात नेले जात होते.
मात्र, रस्त्यात रुग्णवाहिका बंद पडल्याने दुसरी रुग्णवाहिका बोलवण्यात आली.
त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले,
अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. याप्रकरणी रुग्णवाहिकेविरोधात पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.
सूर्यकांत देसाई हे शिवसेनेचे माजी आमदार होते. 1995 ते 2000 या कालावधीत त्यांनी
परळ-लालबाग विधानसभा मतदारसंघाचे (Pearl-Lalbagh Assembly Constituency) प्रतिनिधित्व केले होते.
सध्या ते डोंबिवली येथे वास्तव्यास होते.
Web Title :- Former MLA Suryakant Desai Passed Away | shivsena former mla suryakant desai passed away during transfer to another hospital at dombivli
हे देखील वाचा :
Pune Traffic Updates News | शिवाजीनगर व विश्रामबाग वाहतूक विभागाअंतर्गत पार्कींगबाबत आदेश निर्गमित
Gautami Patil | गौतमी पाटीलच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडीओप्रकरणी गुन्हा दाखल