डहाणु : बहुजननामा ऑनलाईन – आदिवासी समाजासाठी काम करणारे डहाणु विधानसभा मतदारसंघाचे तीन वेळा आमदार, खासदार व माजी मंत्री शंकर सखाराम नम Former MP Shankar Nam (वय ७२) यांचे ह्दयविकाराच्या झटक्याने शनिवारी सकाळी निधन झाले. शंकर नम यांची शुक्रवारी तब्येत बिघडल्याने त्यांना ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान शनिवारी सकाळी साडे नऊ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचे निधन झाले.
शंकर नम Former MP Shankar Nam हे तीन वेळा डहाणु विधानसभा मतदारसंघाचे आमदार, एक वेळा खासदार तर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री व उपमंत्री होते. सुधाकार नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी पाटबंधारे, खार जमीन, आदिवासी विकास आदि विभागाचे राज्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केले.
डहाणु तालुक्यातील तवा या आपल्या गावातील सरपंचापासून त्यांनी राजकीय कारकीर्द सुरु केली. ते डहाणु पंचायत समिती सदस्य होते. ते काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर डहाणु विधानसभा मतदारसंघातून १९८५ मध्ये आमदार म्हणून निवडून आले. सलग तीन वेळा ते आमदार होते. १९९८ मध्ये ते डहाणु लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले होते. परंतु, अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार अल्पवधीत कोसळल्याने ते ११ महिने खासदार राहू शकले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुलं, मुलगी असा परिवार आहे. डहाणू तालुक्यातील तवा या मूळ गावी संध्याकाळी चार वाजता अंत्यसंस्कार होणार आहे.
कृपया हे देखील वाचा:
लहान मुलांसाठी आधार कार्ड बनवण्यासाठी ‘ही’ कागदपत्रे अत्यावश्यक, जाणून घ्या
नव्या नियमावलीनुसार E-Pass संदर्भातही मोठे बदल, जाणून घ्या
…म्हणून मध्यरात्री फेसबुक लाईव्ह करत व्यापाऱ्याने हाताची नस कापली
SBI, HDFC, ICICI च्या खातेधारकांसाठी महत्वाची बातमी, जून महिन्याअखेर बंद होणार ‘ही’ सुविधा