बहुजननामा ऑनलाईन टीम – इंग्लंडचा माजी जलदगती गोलंदाज जोए बेंजामिन (वय 60) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने मंगळवारी (दि. 9) निधन झाले. त्यामुळे इंग्लंड क्रिकटला मोठा धक्का बसला आहे.
बेंजामिन यांनी वयाच्या 33 व्या वर्षी 1994 साली इंग्लंडकडून कसोटी पदार्पण केले होते. त्याचवर्षी त्यानी वन डे क्रिकेटमध्येही पदार्पण केले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांना दीर्घकाळ खेळता आले नाही, तर कौंटी क्रिकेटमध्ये त्यांनी बरीच वर्ष गाजवली होती. त्यांनी सरे क्रिकेट क्लबकडून दमदार कामगिरी केली. त्यांनी प्रथम श्रेणी व लिस्ट ए क्रिकेटमध्ये मिळून 560 विकेट्स घेतल्या आहेत. बेजामिन यांचा 1961 मध्ये कॅरेबियन बेट सेंट किट्स येथे जन्म झाला होता. 15 वर्षाचे असताना ते कुटुबीयांसह ब्रिटेनमध्ये स्थायिक झाले. त्यांनी वॉर्विकशर कौंटीतून खेळायला सुरुवात केली. 27 वर्षांचे असताना त्यांनी पहिला प्रथम श्रेणी सामना खेळला.1988 मध्ये त्यांनी वॉर्विकशरकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. 1992 नंतर ते सरे क्लबकडून खेळत दमदार कामगिरी केली होती.