मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Former BMC chief K Nalinakshan | मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त आणि सनदी अधिकारी के. नलिनाक्षन (Former BMC chief K Nalinakshan) हे बुधवारी घरी पूजा करत होते. त्यावेळी आरती करत असताना कापुराचा दिवा लागून त्यांच्या लुंगीने पेट घेतला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. अखेर शुक्रवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू (Death) झाला आहे. ते ७९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
१९६७ च्या तुकडीतील के. नलिनाक्षन (K Nalinakshan) हे आयएएस अधिकारी (IAS officer) होते. ते मूळचे कोझिकोडे (Kozhikode ) येथील असून त्यांनी १९९९ ते २००१ या कालावधीत मुंबई पालिका आयुक्त (Municipal Corporation of Greater Mumbai) म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर वाहतूक आणि सीमा शुल्क विभागा (Customs Department) चे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. चर्चगेट येथील निवासस्थानी ते राहात होते.
बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे नलिनाक्षन पूजा करत असताना आरतीच्या वेळी कापुराचा दिवा लागून त्यांच्या लुंगीने पेट घेतला. त्यावेळी घरी पत्नी आणि नोकर होते. हि घटना घडली यावेळी सर्वानी त्यांचा वाचवण्याचा प्रयत्न सुरु केला परंतु देवघराला आतून कडी लावली होती. शिवाय कमरेला पट्टा असल्याने जळती लुंगी बाजूला सारता आली नाही. सर्वांनी अथक प्रयत्नांनंतर त्या खोलात प्रवेश करत त्यांना भायखळा येथील मसिना रुग्णालया(Masina Hospital)त दाखल केले. या दुर्घटनेत ते ८० टक्के भाजले होते. पहिल्या दिवशी उपचारांना प्रतिसाद देणाऱ्या नलिनाक्षन यांची प्रकृती नंतर बिघडतच गेली अखेर शुक्रवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
Web Title : former commissioner mumbai municipal corporation k nalinakshan no more
Pune Crime News | कोंढव्यात दुचाकीस्वार 10-12 जणांच्या टोळक्याचा राडा, तरूणाला बेदम मारहाण
Prakash Ambedkar | प्रकाश आंबेडकर यांच्यावर तातडीने बायपास सर्जरी, मेडीकल बुलेटीन जारी (व्हिडिओ)