बहुजननामा ऑनलाइन टीम – मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे दिग्गज नेते कमलनाथ (Kamalnath) यांची प्रकृती खालावल्याने त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कमलनाथ Kamalnath यांना ताप आला होता. त्यामुळे ते बुधवारी (दि. 9) सकाळी रुग्णालयात दाखल झाले आहेत. याठिकाणी त्यांच्यावर डॉक्टरांचा निगराणीखाली उपचार सुरु आहेत.
काही दिवसापूर्वी कमलनाथ Kamalnath मध्य प्रदेशातील इंदूर येथील खासगी रुग्णालयात लिफ्ट पडण्याच्या अपघातातून बचावले होते. त्यावेळी अपघाताच्या परिणामामुळे घाबरल्याने त्यांची तब्येत ढासळली होती. त्यानंतर रुग्णालयातच त्यांचा रक्तदाब तपासला होता. हा अपघात झाल्यानंतर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कमलनाथ Kamalnath यांच्या प्रकृतीबाबत फोन करून चौकशी केली होती. कोरोना काळात कमलनाथ सक्रिय आहेत. या दरम्यान त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. केंद्रात अनेक मंत्रालयाचा पदभार सांभाळलेले कमलनाथ 2018 मध्ये मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री झाले. मात्र, कॉंग्रेसमधील बंडखोरीनंतर एका वर्षातच कॉंग्रेसचे सरकार पडले. त्यानंतर भाजपने सरकार स्थापन केले.
कृपया हे देखील वाचा:
पुढील 3 तासात पुण्यासह ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा
RCFL मध्ये नोकरीची सुवर्णसंधी ! ‘या’ पदासाठी होणार भरती, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
आता 12 वर्षाखालील बालकांसाठीही कोरोना लस, ट्रायल सुरु
या’ दिवशी BoB विकणार ही 46 खाती, जाणून घ्या कोणाची नावं आहेत यादीत