बहुजननामा ऑनलाईन- बिहार विधानसभा निवडणूक 2020 साठी भारतीय जनता पार्टी (भाजपा) ने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पार्टीचे निवडणूक प्रभारी नियुक्त केले आहे.
https://twitter.com/ANI/
भाजपाचे राष्ट्रीय महासचिव आणि मुख्यालय प्रभारी अरुण सिंह यांच्याकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रात म्हटले आहे की, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी देवेंद्र फडणवीस यांना आगामी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी प्रभारी नियुक्त केले आहे. ही नियुक्ती तत्काळ प्रभावाने लागू असेल.