नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने परकीय चलन तस्करीचा पर्दाफाश केला आहे. सुरक्षा कर्मचार्यांना याची माहिती दिली असता त्यांनी आरोपींच्या मालाची झडती घेतली. परदेशी चलन अगदीच छोट्या घड्या करून भुईमूगमध्ये भरले गेले. एवढेच नाही तर आरोपींनी बिस्कीट आणि मिठाईच्या आतही परदेशी चलन घेऊन जात होते, त्यामुळे सीआयएसएफच्या टीमला आश्चर्य वाटत आहे.
या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यात सीआयएसएफचे अधिकारी शेंगदाणे आणि बिस्किटांमधून विदेशी पैसे काढत असल्याचे दिसत आहे. ही घटना मंगळवारची असून नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक व्यक्ती खाण्या-पिण्याचे सामान घेऊन पोहोचली. विमानतळावर उपस्थित सुरक्षा कर्मचार्यांना त्या व्यक्तीवर संशय आल्याने चौकशीसाठी ते त्याला त्यांच्यासोबत घेऊन गेले.
@CISFHQrs *detected high volume of foreign currency worth approximately INR 45 lakh at IGI Airport, New Delhi concealed in eatable items.. cooked mutton pieces, peanuts, biscuit packets and other eatable items kept inside his baggage. pic.twitter.com/5yeEdmtSAz
— Ravi Jalhotra (@ravijalhotra) February 12, 2020
सुरक्षा कर्मचाऱ्यांनी संशयिताकडून शेंगदाणे, बिस्किटे आणि मिठाईत लपवून ठेवलेल्या ४५ लाख रुपयांचे विदेशी चलन जप्त केले. संशयिताने इतक्या चलाखीने चलन लपवून ठेवलेले बघून सुरक्षा कर्मचाऱ्यांना धक्काच बसला. चौकशी केली असता आरोपी ते सामान दुबईला घेऊन जात असल्याचे समजले. आरोपीचे नाव मुराद आलम असून सर्व महत्वाची माहिती घेतल्यानंतर सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांनी त्याला कस्टम विभागाकडे सोपवले. ही काही पहिली घटना नसून लोकं तस्करीसाठी विचित्र प्रकार करतात, तेव्हा अशा धक्कादायक घटना समोर येतात.