बहुजननामा ऑनलाइन टीम – कमजोर आणि किरकोळ शरीरयष्टीचे सर्वात मोठे कारण तुमचा डाएट आहे. तुम्ही काय, केव्हा आणि किती खात आहात याकडे लक्ष दिले पाहिजे. हलक्या पद्धतीने वजन वाढवण्यासाठी नेहमी आपले ताट बॅलन्स ठेवले पाहिजे. हाय कॅलरी फूड्सचे सेवन करा. जे उर्जा प्रदान करतात आणि सर्व मांसपेशींची निर्मिती करतात. येथे अशा काही फूड्सची माहिती दिली आहे जे तुमचे वजन वेगाने वाढण्यास मदत करतील.
1. बगेल्स
बगेल्स केवळ एक्स्ट्रा कॅलरीने भरलेले असतात. यांचे सेवन करून तुम्ही तुमचे वजन वाढवू शकता.
2. ड्राय फ्रूट्स
एक किंवा दोन ड्राय फ्रूट्स खावून कॅलरी वाढवा. रोज दूधात भिजवून यांचे सेवन केल्याने वजन वाढते.
3. हेल्दी ऑईल
जेवणात एक्स्ट्रा फॅट सहभागी करण्याची एक सोपी पद्धत म्हणजे जेवणासाठी चांगले तेल निवडा. जैतूनचे तेल हेल्दी मोनोअनसॅच्युरेटेड फॅटने समृद्ध असते. पास्ता, ब्रेड, किंवा भाज्यांमध्ये कॅलरी आणि चव वाढते.
4. एवोकॅडो
एवोकॅडो मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिडने समृद्ध आहे. आपल्या आवडीच्या स्मूदी रेसिपीमध्ये एवोकॅडो सहभागी करा.
5. नट्स आणि सीड्स
नट्स आणि सीड्समध्ये पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट असते, जे डाएटमध्ये हेल्दी कॅलरी सहभागी करतात. बदाम, अक्रोड, पेकान, काजू, सूर्यफूलाचे बी, आणि भोपळ्याचे बी, सर्व तुमच्यासाठी चांगले आहे. भाजलेले नट्स आणि बी आईस्क्रीम, दही, किंवा सलाडच्यावर मुठभर टाकून खा.
6. ग्रेनोला
कडधान्य, सुकामेवा, बीयांसाबत ग्रेनोला बनवा. ग्रेनोला एका एयरटाइट कंटेनरमध्ये स्टोर करा हे नाश्त्यात खा.
7. प्रोटीन बार्स
प्रोटीन बारसह कॅलरी आणि प्रोटीन दोन्हीचे सेवन वाढवू शकता. फिटनेस सप्लीमेंट सेक्शनच्या ड्रगस्टोअर्समध्ये हाय-कॅलरी प्रोटीन बार मिळू शकतो.