नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Food Delivery APP-GST | जर तुम्ही ऑनलाईन जेवण मागवत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण अॅपवरून खाद्यपदार्थ मागवणार्या ग्राहकांना माहित असावे की, मोदी सरकारने (Modi Government) झोमॅटो (Zomato) आणि स्विगी (Swiggy) सारख्या फूड डिलिव्हरी अॅपवर 5 टक्के टॅक्स (Tax on Online Food Delivery) लावला आहे. हा नवीन नियम 1 जानेवारी 2022 पासून लागू होत आहे. (Food Delivery APP-GST)
फूड डिलिव्हरी अॅपला द्यावा लागेल 5 टक्के टॅक्स
केंद्रीय अर्थ मंत्रालयांच्या (finance minister of india) आदेशानुसार अॅप कंपन्यांना रेस्टॉरंटप्रमाणे इनपुट टॅक्स क्रेडिटचा फायदा मिळणार नाही. मोठ्या कालावधीपासून फूड डिलिव्हरी अॅपच्या सेवांना जीएसटी (GST) च्या कक्षेत आणण्यासाठी 17 सप्टेंबरच्या जीएसटी परिषदेच्या (GST Council) बैठकीत मंजूरी देण्यात आली होती. ही नवीन व्यवस्था देशभरात 1 जानेवारी 2022 पासून लागू केली जात आहे. (Food Delivery APP-GST)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
ग्राहकांवर काय होणार परिणाम
– 5 टक्के टॅक्स सरकार फूड डिलिव्हरी करणार्यांकडून वसूल करेल आणि या कंपन्या वेगळ्या मार्गान ग्राहकांच्या खिशातून हे पैसे काढून घेतील.
– यामुळे 1 जानेवारीपासून ऑनलाइन फूड ऑर्डर करणे महाग होऊ शकते.
– रेस्टॉरंटला हा 5 टक्के टॅक्स द्यावा लागत होता, आता तो अॅपवर लावला आहे.
– आता ऑनलाइन फूड डिलिव्हरी करणारे अॅप्स आता त्याच रेस्टॉरंटमधून फूड आर्डर घेतील, जे जीएसटी अंतर्गत नोंदणीकृत आहेत.
Web Title :- Food Delivery APP-GST | food delivery app must pay gst from 1 january 2022.