मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – भारताने सोशल मिडीयाबद्दलचे (Social Media Rules) काही नियम तयार केले आहेत. ट्विटर (Twitter), व्हॉट्सॲप (WhatsApp), फेसबुक (Facebook) आणि इतर सर्वच सोशल मिडीया ॲपला (Social Media Platforms) लगाम घालण्यासाठी मोदी सरकारने (Modi Government) कंबर कसली आहे. परंतु ‘ब्लू टीक’ (Blue Teak ) आणि लसीकरण यातील फरक पहिल्यांदा मोदी सरकारने समजून घ्यावा. ब्लू टीक (Blue Teak ) पेक्षा लोकांच्या लसीकरणाकडे (Vaccination) जास्त लक्ष द्यावं, असा सणसणीत टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी भाजपला (BJP) लगावला आहे.
सोशल मीडियासाठी नियमावली तयार
मोदी सरकारने ट्विटर, फेसबुकसह सर्वच सोशल मीडियासाठी नियमावली तयार केली आहे. पण, यामुळे विरोधकांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. ट्विटरवर संपूर्ण भाजप आणि केंद्र सरकार ‘ब्लू टीक’ची लढाई लढताना दिसत आहे. तर दुसरीकडे देशातील जनता लसीकरणासाठी लढाई लढत आहे, असे परखड मत नवाब मलिक यांनी व्यक्त केलं आहे.
सरकार अहंकारात मश्गुल
ट्विटरवरील ‘ब्लू टीक’ असेल किंवा कोरोना काळातील लोकांचे लसीकरण असेल यावरुन केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष करुन केंद्र सरकार आपल्याच अहंकारात मश्गुल असल्याची टीकाही नवाब मलिक यांनी केली आहे.
कृपया हे देखील वाचा:
तुम्हाला प्रायव्हेट वाहनानं एका जिल्ह्यातून दुसर्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास लागणार का ? जाणून घ्या
काँग्रेस-राष्ट्रवादी मधील तणाव निवळला? बाळासाहेब थोरात पोहोचले शरद पवारांच्या घरी (व्हिडीओ)
दुर्दैवी ! मासेमारीसाठी गेलेल्या तिघा भावंडांचा तलावात बुडून मृत्यू, सांगली जिल्ह्यात खळबळ
‘या’ कारणामुळं तब्बल 27 वर्षांनंतर बिल आणि मेलिंडा गेट्स यांनी घेतला घटस्फोट, जाणून घ्या