नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इन्स्टंट मेसेजिंग ॲप Whatsapp वर नेहमी Error दिसून येतो. ‘Whatsapp has stopped’ असं येतं आणि त्यानंतर हा ॲप चालत नाही. आम्ही आज तुम्हाला असे काही ट्रिक्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला ही समस्या येणार नाही.
क्लियर करा Cache
जर तुमच्या Whatsapp मध्ये Error येत असेल तर ॲपचा Cache क्लियर करा. कॅच क्लियर कसं करायचं याबद्दलही आम्ही तुम्हाला सांगतो.
असं क्लियर करा Cache
1. सर्वात आधी मोबाईलच्या सेटिंग मध्ये जा आणि ॲप एन्ड नोटिफिकेशन्स वर टॅप करा.
2. आता see all apps या पर्यायावर टॅप करा.
3. हे झाल्यावर आता Whatsapp वर टॅप करा.
4. आता storage and Cache या पर्यायावर टॅप करा.
5. आता Whatsapp च्या clear Cache वर टॅप करून Whatsapp मधील कॅच क्लियर करू शकता.
Whatsapp ला करा Update
अनेक वेळा आपण Whatsappचे जुने व्हर्जन वापरत असतो. पण या व्हर्जन मध्ये नंतर एरर यायला सुरुवात होते. जर तुम्हाला कोणताही अडथळा नको असेल तर ॲप वेळोवेळी अपडेट करत राहा.
Reinstall करा Whatsapp
जर एवढं करूनही तुमच्याॲप मध्ये एरर येत असेल तर तो डिलीट करून पुन्हा गूगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा. आता ॲप व्यवस्थित चालेल. या तीन पद्धतीने तुम्ही Whatsapp मध्ये येणारा Error काढून टाकू शकता.