छत्तीसगड : चकमकीत 5 नक्षलवाद्यांचा ‘खात्मा’

nakshalvad
August 24, 2019

रायपूर : वृत्तसंस्था – नुकतीच छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाल्याचे समोर आले आहे. या चकमकीत 5 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. दरम्यान या चकमकीत सुरक्षा दलाचे दोन सैनिक जखमी झाले आहेत. या चकमकीनंतर या परिसरातील जंगलांमध्ये मोठी शोधमोहिम हाती घेण्यात आली.

नारायणपूर जिल्ह्यातील अबुझमाड भागातील जंगलात ही चकमक झाली. शनिवारी सकाळी झालेल्या या चकमकीत सुरक्षा दलाच्या सैनिकांनी 5 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. सुरक्षा दलाच्या या गोळीबारादरम्यान काही नक्षलवाद्यांनी तेथून यशस्वीरीत्या पळ काढला. यात दोन सैनिक जखमी झाले आहेत.

गंभीर जखमी झालेल्या सुरक्षा दलाच्या सैनिकांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. 5 नक्षलवादी ठार झाल्यानंतर सैन्याने या भागात शोधमोहिम हाती घेतली असून या परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.