बहुजननामा ऑनलाईन टीम : आपल्या मुलीसह सुट्टी एन्जॉय करण्यास गेलेल्या महिलेवर 5 जणांनी सामूहिक बलात्कार केला आहे. सामूहिक बलात्कारानंतर आरोपींनी या घटनेचा व्हिडिओ व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर केला. ही घटना इटलीमधील सुरेन्टो प्रसिद्ध शहरात घडली. न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीनंतर या प्रकरणाशी संबंधित काही खुलासे प्रथमच समोर आले आहेत.
ब्रिटनमधील केंट येथील रहिवासी असलेल्या 50 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना सुट्टीच्या शेवटच्या दिवशी घडली. इटलीमध्ये राहणाऱ्या पाच आरोपींपैकी काही हॉटेल कर्मचारी आणि काही माजी कर्मचारी होते. हॉटेलमध्येच महिलेला कोलड्रिंग देताना आरोपीने अमली पदार्थांचे मिश्रण केले होते.
पतीच्या मृत्यूच्या काही काळानंतर ही महिला आपल्या मुलीसह बाहेरगावी इटलीला गेली होती. या प्रकरणात पाच आरोपींना ९ वर्षाची शिक्षा देण्याची मागणी एका वकीलाने केली आहे.
फिर्यादी अँटोनियो बार्बा यांनी न्यायालयात सांगितले की, या प्रकरणातील आरोपींची शिक्षा एक उदाहरण म्हणून मांडली जावी. डीएनए अहवालातही या घटनेत आरोपींचा सहभाग असल्याची पुष्टी करण्यात आली आहे.
महिला एक प्रसिद्ध रिसोर्ट इलिमुरी मध्ये थांबली होती तिथे ही घटना घडली. महिलेच्या फोनवर 2 आरोपींचे फोटो होते, ज्यामुळे त्यांना पकडण्यात यश आले. त्याचवेळी आरोपींनी त्यांच्यावरील गुन्हा नाकारला आणि औषध चाचणीचे रिपोर्ट चुकीचे असल्याचे सांगितले आहेत. या प्रकरणात न्यायालयात सुनावणी अजूनही सुरू आहे.
Visit : bahujannama.com