बहुजननामा ऑनलाईन – कोरोनामुळे चित्रपट उद्योग पूर्णपणे ठप्प पडला आहे. अनेक मोठमोठ्या निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे निर्मात्यांना कोट्यवधींचे नुकसान होत आहे. दरम्यान या प्रतिकूल परिस्थितीची नोंद घेत ऑस्करने आपल्या नियमांमध्ये तब्बल 92 वर्षांची परंपरा मोडली आहे. नव्या नियमानुसार आता ऑनलाईन प्रदर्शित झालेले चित्रपट देखील ऑस्कर स्पर्धेत भाग घेऊ शकतील असे नमूद केले आहे.
Here's what you need to know about the #Oscars:
– For this awards year only, streamed films will be eligible for Best Picture
– Going forward, the Sound Mixing and Sound Editing awards will be combined into one category: Best SoundFor more details: https://t.co/LjBJJHExCN
— The Academy (@TheAcademy) April 28, 2020
ऑस्कर हा पुरस्कार प्रतिष्ठीत पुरस्कार ‘अॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट अँड सायंस’ या संस्थेमार्फत दिला जातो . हा पुरस्कार पटकावणार्याला जगातील सर्वोत्कृष्ट कलाकारांच्या पंक्तीत स्थान मिळते. संस्थेच्या नियमानुसार केवळ थिएटरमध्येच प्रदर्शित झालेले चित्रपट ऑस्कर स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जातात. परंतु कोरोना विषाणूमुळे केवळ या वर्षासाठी ऑस्करने नियमात बदल केला आहे. 92 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच थिएटरऐवजी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांनाही ऑस्कर स्पर्धेत भाग घेता येईल. अॅकेडमी संस्थेने ट्विट करुन ही माहिती प्रेक्षकांना दिली.
एनपीन्यूज24 नेटवर्क