नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागरिकत्व कायद्याविरोधात दिल्लीतील शाहीन बाग भागात निदर्शने सुरू आहेत. वृत्तसंस्था एएनआयच्या माहितीनुसार, आता शाहीन बाग येथे एका व्यक्तीने गोळी झाडली आहे. गोळी झाडणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे.
#WATCH Delhi: Man who had fired bullets in Shaheen Bagh area being taken away from the spot by police. pic.twitter.com/lenDhRcWGD
— ANI (@ANI) February 1, 2020
यापूर्वी 30 जानेवारी रोजी दिल्लीच्या जामिया भागात सीएए आणि एनआरसीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर एका व्यक्तीने अचानक गोळी झाडली होती. या हल्ल्यात एक विद्यार्थी जखमी झाला. ज्याने गोळी झाडली आहे तो अल्पवयीन असल्याचे सांगितले जात आहे.
जामिया गोळीबारानंतर दक्षिण-पूर्व दिल्ली जिल्ह्यातील डीसीपी चिन्मय बिस्वास म्हणाले होते की, “ही गोळी देशी बंदुकीतून चालवली गेली आहेत. आरोपींनीही घोषणाबाजी केली.” घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, “बंदूकधारी स्पष्टपणे ओरडला की, ‘तुला स्वतंत्र्य पाहिजे ना ?आता स्वातंत्र्य घ्या.’ त्यानंतर त्याने गोळी चालविली. विद्यार्थ्यांच्या गर्दीच्या दिशेने पिस्तूलने गोळी चालविली गेली.”
#WATCH Delhi: Man who fired bullets in Shaheen Bagh has been taken away from the spot by police. The man claims to be Kapil Gujjar, a resident of Dallupura village (near Noida border). pic.twitter.com/6xHxREQOe1
— ANI (@ANI) February 1, 2020
आता अशाच प्रकारे दिल्लीतील शाहीन बाग भागात निदर्शने सुरू असताना एकाने गोळी झाडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे मात्र सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणाविषयी पोलीस अधिक तपास करीत आहेत.