Firing In Ambegaon Bk Pune | चेष्टामस्करीतून केला गोळीबार ! आंबेगाव बुद्रुकमधील घटनेत मित्र जखमी, निलेश जाधवला केली अटक

पुणे : Firing In Ambegaon Bk Pune | मोकळ्या मैदानात मोबाईलवर गेम खेळत असताना चेष्टामस्करीतून एकाने मित्रावर गोळीबार केला. त्यात एक मित्र जखमी झाला असून पोलिसांनी गोळीबार करणार्याला अटक केली आहे. (Ambegaon Bk Pune Crime News)
याबाबत जखमी करण भारत गजरमल (वय १९, रा. गणेश सुपर शॉपीजवळ, दभाडी, आंबेगाव) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी नीलेश ऊर्फ बाब्या संतोष जाधव Nilesh Alias Babya Santosh Jadhav (वय २१, रा. सिंहगड महाविद्यालय परिसर, दभाडी, आंबेगाव) याला अटक केली आहे. ही घटना सिंहगड कॅम्पसमधील (Sinhgad College Campus) जंबो बिअर शॉपीचे समोरील मोकळया मैदानावर बुधवारी रात्री साडेनऊ वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलेश, करण आणि एक अल्पवयीन मुलगा मोबाईलवर गेम खेळत गप्पा मारत बसले होते. त्यावेळी नीलेश व करण यांच्यात चेष्टा मस्करीतून वाद निर्माण झाला. तेव्हा रागाच्या भरात नीलेश याने आपल्याकडील गावठी पिस्तुलातून करण याच्यावर गोळी झाडली. गोळी खाद्यांला लागल्याने त्यात करण जखमी झाला. करण याला रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांनी नीलेश जाधव याला अटक केली आहे.
करण हा सेल्समन म्हणून काम करतो. नीलेश हा अधुनमधून डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. नीलेश याने गावठी पिस्तुल कशासाठी व कोणाकडून मिळविले होते, याचा तपास करण्यात येत आहे. न्यायालयाने अधिक तपासासाठी दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी (PSI Nilesh Mokashi) तपास करीत आहेत.
Comments are closed.