शेख नजीब अब्दुल गफार जागीच ठार
नांदेड : (माधव मेकेवाड) बहुजननामा ऑनलाईन – नांदेड शहर मध्ये गोळीबार होणे ही काय घटना नवीन नाही पण त्या गोळीबार मध्ये जीव घेणे हे आता घडले असल्याने पोलीस सतर्कतेच्या मार्गाने लागले असल्याचे दिसले आहे. मामा चौक हा परिसर सध्या भीतीचा झाला असून अनेक दिवसा पासून ह्या ठिकाणी चोरी करण्यासाठी चोरटे रस्त्याने फिरत असतात ते जबरी चोरी तर करतात पण उलट बेदम मारहाण देखील करतात.आय जी ऑफिस च्या जवळ काल मध्यरात्री चोरटे चोरी च्या भावनेने एकास अडवले व त्यांनी त्यावर गोळीबार केला केला व त्यांची कार पलायन केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अहमदपूर येथील रहिवासी शेख नजीब अब्दुल गफार हे भोकरहून अहमदपूरकडे कारने प्रवास करत होते. कोठा येथील आयजी ऑफिसजवळ दोन दुचाकीस्वार शेख नजीब यांच्या कार समोर येत त्यांच्यावर गोळीबार केला. यात उजव्या हाताच्या खाली गोळी लागल्याने शेख यांचा जागीच मृत्यू झाला.नेमकं त्यांचा खून झाला आहे की चोरटे त्यांना पैशाच्या अभावी त्यांना संपवले याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली करत आहेत.