पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – काही दिवसांपूर्वीच सावरकर जयंतीनिमित्त हिंदू महासभेने मुलींना सुऱ्या वाटप केले होते त्यांनतर आता विश्व हिंदू परिषदेतील मुलींनी एअर रायफलचे ट्रिगर दाबत, हातात तलवारी मिरवत विनापरवाना शोभा यात्रा काढल्याचा प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये समोर आलं आहे. या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विश्व् हिंदू परिषदेच्या वतीने काल (रविवार) संध्याकाळी ५ ते रात्री १० च्या ही शोभा यात्रा काढण्यात आली. दरम्यान या शोभा यात्रेत २०० ते २५० कार्यकर्ते सहभागी झालेले होते. यमुनानगर येथील अंकुश चौक ते ठाकरे मैदान दरम्यान दुर्गा वाहिनीची शोभा यात्रा काढण्यात येत होती. या शोभा यात्रेत चार मुलींच्या हातात एअर रायफल असल्याचे निदर्शनात आले. या वेळी एअर रायफलचे ट्रिगर दाबल्याने मोठा आवाजही आला. त्याचबरोबर पाच मुली हातात तलवारी मिरवत असल्याचं ही दिसून आलं. तलवारीवर बंदी असतानाही मिरवण्यात आल्या त्यामुळे विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास निगडी पोलीस करत आहेत.