उस्मानाबाद : बहुजननामा ऑनलाईन – कट कारस्थान करून शेतकऱ्याची आर्थिक फसवणूक करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना जबाबदार धरण्यात आले आहे. खासदार निंबाळकर यांच्याह 52 जणांवर फसवणूक व शेतकऱ्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पाच महिन्यानंतर उस्मानाबाद पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
दिलीप ढवळे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. दिलीप ढवळे यांनी आत्महत्येपूर्वी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्या नावे चिठ्ठी लिहून गळफास घेतला होता. ऐन लोकसभा निवडणुकीत उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडळवे येथील शेतकरी ढवळे यांनी आत्महत्या केली होती. ढवळे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहली होती. यामध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आर्थिक फसवणूक केल्यामुळे आपल्याला मानहानी सहन करावी लागली. त्यातून जमिनीवर जप्ती आली. या सर्व त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीत लिहले होते.
पोलिसांनी घटनास्थळावरून मिळालेल्या सर्व गोष्टी साक्षीदारांसमक्ष ताब्यात घेऊन कुटुंबियांचा जबाब नोंदवून घेतला. आणि मयत शेतकऱ्याने लिहिलेली चिठ्ठी हस्ताक्षर तज्ज्ञांकडे तपासणीसाठी पाठविली होती. याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर, वसंतदादा बँकेचे अध्यक्ष विजय दडनाईक, तेरणा कारख्यान्याच्या अध्यक्ष अनंदीदेवी राजेनिंबाळकर, कारखान्याचे तत्कालीन कार्यकारी संचालक एशा एकूण 52 जणांविरुद्ध ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.