सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा सोलापूर शहर जिल्ह्याच्यावतीने समाजातील गरजू विद्यार्थीनीच्या उच्च शिक्षणासाठी (एमबीबीएस) समाजातील दानशूर लोकांच्या सहकार्याने आर्थिक मदत करण्यात आली. माजलगाव (जि. बीड) येथील वसंत हजारे यांनी मुलीच्या उच्च शिक्षणासाठी मदतीचे आवाहन केले होते. वसंत हजारे यांचे माजलगाव येथे छोटेसे सलूनचे दुकान आहे. त्या व्यवसायावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. त्यांची मुलगी राखी हिचा लातूर येथे वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश निश्चित झाला. ॲडमिशन मिळाले. त्यासाठीचा खर्च हा हजारे परिवाराला पेलवणारा नसल्याने त्यांनी मदतीचे आवाहन केले होते. त्या आवाहनास प्रतिसाद देत सोलापूर येथील नाभिक समाजाचे वैभव शेटे यांनी वसंत हजारे यांच्याशी संपर्क साधला व समाजाकडून मदत देण्याबाबत सांगितले. त्याप्रमाणे सोलापूर शहरातील महामंडळाचे पदाधिकारी समाजबांधव यांच्याशी चर्चा करुन निधी जमा केला. १४ हजार रुपये रोख निधी जमा झाला होता.
महाराष्ट्र नाशिक महामंडळाचे राज्याध्यक्ष कल्याणराव दळे यांच्या हस्ते हा जमा निधी वसंत हजारे यांना देण्यात आला. याप्रसंगी महामंडळाचे शहराध्यक्ष मनोज डिगे, गणेश वाघमारे, युवक अध्यक्ष आनंद वाघमारे, स्वप्नील रणदिवे, वर्षा राऊत, राधिका राऊत, पांडुरंग पवार, प्रकाश शिंदे, दिलीप कोरे, सचिन माने, श्रीकांत राऊत, रोहित शेटे, विश्वनाथ माने, सिलसिध्द राऊत, मोहन गोरे, सुनील राऊत, सुमित गवळी, आतिश धोत्रे, सुरेश राऊत, गणेश शिंदे, जयश्री पवार, मल्लिनाथ कोरे आदी समाजबांधव उपस्थित होते.