नालासोपारा : बहुजननामा ऑनलाइन – अलीकडेच पालघर जिल्ह्यात पोलीस खात्यात प्रचंड गोंधळ उडाला आहे. जिल्यातील कल्याण शाखेत बदली झालेले पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे यांच्यावर दोन गुन्हे दाखल करण्यात आल्याच्या कारणावरून निलंबित केले आहे, पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी गुरुवारी या संदर्भात आदेश दिले आहे.
दरम्यान हितेंद्र विचारे यांची काहीच दिवसांपूर्वीच वसई गुन्हे शाखेतून कल्याण शाखेत बदली करण्यात आली होती , परंतु ते कामावर हजर न राहता सुट्टीवर गेले. युपीचे खासदार सत्यपाल सिंग यांच्यासोबतचा फोटो विचारे यांनी सोशल मीडियावर वायरल केला. त्यानंतर विचारे यांच्यावर निवडणूक प्रक्रियेत अधिकारी किंवा कर्मचारी यांनी कोलप्रतिनिधीस मदत केल्याप्रकरणी (१२९),(१),(२),(३) लोकप्रतिनिधी कायदा १९९१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गुन्हांच्या आरोप करत त्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
Visit : bahujannama.com