भोकर : (माधव मेकेवाड) बहुजननामा ऑनलाइन – साहित्यरत्न,आण्णा भाऊ साठे नामांतर लढ्यातील प्रथम शहीद पोचिराम कांबळे यांचे विषयी सोशल मीडिया फेसबुक च्या माध्यमातून अपमानास्पद तथा अर्वाच्छ आशा अशोभनीय भाषेचा वापर करून भावना दुखावल्या प्रकरणी कपिल के सरोदे यांच्या बद्दल भोकर पोलिसात उत्तम वामनराव बाबळे,आण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन(प्रदेश अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य) यांनी दिलेले तक्रारी अर्जावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कपिल के सरोदे यांच्या वर महामानवा बद्दल अवमान करणे,भावना दुखावणे ,दोन समाजात तेढ निर्माण करणे या बाबतचा गुन्हा दाखल करण्यात भादवी ५०५(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदरील प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार उमेश कारामुंगे हे करत आहेत.
सदरील तक्रार देत असताना भोकर पोलीस स्टेशन मध्ये यावेळी एल ए हिरे,सरोदे बी एस,सखाराम वाघमारे,शिवकुमार गाडेकर,पांडू सूर्यवंशी, संतोष सूर्यवंशी, बालाजी सूर्यवंशी,देवराव मनपूर्वे यांच्या सह बहुसंख्य सामाजिक कार्यकर्ते होते