बहुजननामा ऑनलाईन – सर्वांनी कोरोनापासून सावधानता बाळगावी यासाठी सरकारतर्फे मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. सरपंचांपासून ते पंतप्रधानांपर्यंत अनेकजण कोरोना संदर्भात आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून अचूक माहिती देत काळजी घेण्याचं आवाहन करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सतत ट्विटरवरून कोरोनाची जनजागृती केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी आपली कोरोना विरूद्धची लढाई अद्याप सुरूच आहे असं पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून म्हटलं आहे.
https://twitter.com/
शरद पवार यांनी ट्विटरवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि सर्वांनी हा व्हिडीओ पहावा असं आवाहन त्यांनी केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, “देशातील जनजीवन टप्प्याटप्प्यानं पूर्वपदावर येत आहे. तरीही आपला #Covid-19 विरुद्धचा लढा अजून सुरूच आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकानं योग्य काळजी घेणं आवश्यक आहे. हाच संदेश देणारा व्हिडीओ @WHO नं तयार केला आहे. अवश्य पहा” असं पवारांनी म्हटलं आहे. माझे कुटंब माझी जबाबदारी असा हॅशटॅगही त्यांनी वापरला आहे.
बाजारात किंवा समाजात वावरताना कशी काळजी घ्यायची हेच या व्हिडीओतून सांगण्यात आलं आहे. बिंधास्तपणा हा धोकदायक ठरण्याची शक्यता आहे.